किरण क्रिकेट अकादमी संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश

जस क्रिकेट अकादमी करंडक प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धा

पुणे – हिमांशू चौगुले याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर किरण क्रिकेट अकादमी संघाने बारणे क्रिकेट अकादमी संघाचा 10 गडी राखून पराभव करत येथे होत असलेल्या युनायटेड स्पोर्टस क्‍लब आणि जस क्रिकेट अकादमी यांच्या तर्फे आयोजित जस क्रिकेट अकादमी करंडक 14 वर्षाखालील निमंत्रित टी-20 प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

धानोरी येथील प्रकाश टिंगरे मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्यांदा फलंदाजी करताना बारणे क्रिकेट अकादमी संघाने 20षटकात 5बाद 138धावांचे आव्हान उभे केले.यात विनय कसाळे याने 54 चेंडूत सर्वाधिक नाबाद 56 धावा केल्या. विनयला विश्वजीत फेगडे 23, अथर्व आंबलगे 16, वेदांत अमृतकर 11 यांनी धावा काढून सुरेख साथ दिली. किरण क्रिकेट अकादमीकडून रेहान तांबोळी(2-19), वरद पाटील(1-19), हिमांशू चौगुले(1-25)यांनी अचूक गोलंदाजी करत बारणे क्रिकेट अकादमी संघाला 138 धावात रोखले.

याच्या उत्तरात किरण क्रिकेट अकादमी संघाने हे आव्हान 16.1षटकात एकही गडी न गमावता 139 धावा करून पूर्ण केले.यामध्ये अथर्व पाटीलने 54 चेंडूत 5चौकार, 2षटकारांच्या मदतीने नाबाद 56धावा आणि हिमांशू चौगुलेने 43 चेंडूत 8चौकारांच्या साहाय्याने नाबाद 52धावा करून संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला. अथर्व पाटील व हिमांशू चौगुले यांनी 72 चेंडूत 101 धावांची भागीदारी करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

सविस्तर निकाल:

साखळी फेरी – बारणे क्रिकेट अकादमी : 20 षटकांत 5 बाद 138 (विनय कसाळे नाबाद 56, विश्वजीत फेगडे 23, अथर्व आंबलगे 16, वेदांत अमृतकर 11, रेहान तांबोळी 2-19, वरद पाटील 1-19, हिमांशू चौगुले 1-25) पराभूत वि. किरण क्रिकेट अकादमी 16.1 षटकांत बिनबाद 139 (अथर्व पाटील नाबाद 56, हिमांशू चौगुले नाबाद 52); सामनावीर-हिमांशू चौगुले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.