भांडण सोडवायला गेलेल्या वृद्धास बेदम मारहाण

कामशेत – नाणे मावळातील मुलाची भांडण सोडवायला गेलेल्या एका 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिकास मारहाण करण्यात आली. नायगाव येथे शनिवारी (दि. 25) सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली.या प्रकरणी खंडू विठोबा वावरे (वय 62, रा. नायगाव, ता. मावळ) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत सूरज बबन चोपडे (रा. नायगाव, ता. मावळ) व एक अनोळखी व्यक्‍तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नायगाव येथे शनिवारी (दि. 25) सायंकाळी राम गबाजी शेटे यांचे घरासमोर रोहित दत्तात्रय वावरे याचे भांडण झाले. या भांडणात आरोपी यांनी फिर्यादी खंडू वावरे यांचा मुलगा सुधीर यास मारहाण करीत होता. मुलाला मारहाण होत असल्याचे पाहून फिर्यादी वावरे हे भांडण सोडविण्यास गेले. त्यावेळी अनोळखी आरोपीने त्याचे हातातील काठीने खंडू वावरे यांच्या डोक्‍यात व उजवे खांद्यावर प्रहार केला. या वेळी सूरज चोपडे याने खंडू यांच्या पाठीत दगड फेकून मारल्याने दुखापत झाली आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार समीर शेख तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)