नवीन सुपरहिरो येतो आहे

“अॅव्हेंजर्स- इन्फिनिटी वॉर’मध्ये थानोसने पृथ्वीवरची निम्मी लोकसंख्याच कमी करून टाकली. त्यामुळे आता पुढच्या “अॅव्हेंजर्स एंडगेम’ या सिनेमात नक्की काय होणार, याची सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. या सिरीजच्या निर्माते-दिग्दर्शकांनी प्रेक्षकांसाठी ही खुषखबरी दिली आहे. या सिरीजचा पुढच्या सिनेमाची घोषणा झाली आहे. आता यावेळी सिनेमा बघायला जाताना रुमाल न्यायची आवश्‍यकता नसणार कारण आता कोणतीही रडारड असणार नाही आणि मार्वल स्टुडिओच्या या सिरीजमधील सुपरहिरोज अजून संपलेले नाहीत. आता नवीन सुपरहिरो नवीन सिनेमामध्ये आलेले दिसणार आहेत. त्याची माहिती, त्यांची क्षमता, सुपरपॉवर आणि त्यांच्या अचाट स्टंटबाजीबाबतची तपशीलवार माहिती लवकरच समोर यायला सुरुवात होईल.

आतापर्यंत हॉलिवूडमध्ये सुपरमॅन, स्पायडरमॅन, फॅन्टम, आयर्न मॅन, झोरो, अॅव्हेंजर्स, ऍन्ट मॅन यासारखे किमान 50 सुपर हिरो आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या 150 पेक्षा जास्त सिरीज येऊन गेल्या आहेत. अजूनही या अतिमानवी शक्‍ती असलेल्या सुपरहिरोंची क्रेझ काही कमी होत नाही. प्रत्येक नवीन सिरीजमध्ये हिरो, हिरोईनकडे काही तरी अचाट, अद्‌भुत आणि अतिमानवी शक्ती असते, ज्याच्या आधारे तशाच अफाट शक्ती असलेल्या व्हिलनचा नायनाट केला जातो आहे.

आता या सुपरहिरोंची शक्ती आणखीन वाढवण्यासाठी अॅनिमिटेड सुपरहिरो देखील तयार केले जायला लागले आहेत. केपटाऊन इथल्या इंटरनॅशनल अॅनिमेशन फिल्म फेस्टिव्हलमध्ये अशाच सुपर हिरोची एक अख्खी सिरीजच दाखवली गेली होती.

तर “शाझम’ या अशाच एका सुपरहिरोच्या सिनेमामध्ये एक लहान मुलगा आपल्या अतिंद्रीय शक्तीच्या आधारे स्वतःचे रुपांतर सुपरहिरोमध्ये करतो, अशी कथा नुकतीच पडद्यावर आली. यामध्ये स्वतःचे वय वाढवून अचानक प्रौढ आणि वयस्क आणि पुन्हा लहान बनण्याची क्षमता या मुलामध्ये प्राप्त झालेली असते. अशाप्रकारचे अचाट सामर्थ्य नव्या सुपरहिरोंमध्ये आता लवकरच बघायला मिळणार आहे. “प्रत्येकामध्ये एक सुपरहिरो लपलेला असतो. फक्‍त ईच्छा करण्याची गरज असते.’ हे तो लहान मुलांच्या मनावर ठसवताना दिसतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)