बीड: राज ठाकरेंच्या भाषणामुळे नक्कीच फरक पडेल. त्यांच्या भाषणामुळे 8 ते 10 टक्के मतदार प्रभावित होतील. कारण, राज ठाकरेंचं भाषण हे हा सूर्य आणि हा जयद्रथ असं असल्याचे मुंडेंनी म्हटल आहे. धनंजय मुंडेंनी आज सकाळीच बीड मतदारसंघातील आपल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. त्यानंतर, माध्यमांशी बोलताना मुंडेंनी राज ठाकरेंच्या भाषणाबाबत आपले मत मांडले.
तसेच, धनंजय मुंडेंनी आज प्रभू वैद्यनाथचे दर्शन घेतले. बीडच्या भवितव्यासाठी मतदान होत आहे. वाईट प्रवृतींवर विजय मिळवण्यासाठी प्रभू वैद्यनाथचे दर्शन घेतले. प्रभू वैद्यनाथाच्या आशीर्वादाने बजरंग बप्पा बीडचे संकटमोचक ठरणार!, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पुणे लोकसभा मतदारसंघासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार नसला तरी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पुण्यात जाहीर सभा होणार आहे. बारामती आणि पुणे लोकसभा मतदारसंघाच्या सिमेवर सिंहगड रस्त्यावरील खडकवासला कालव्याच्या बाजूच्या शिंदे मैदानात ही सभा होणार आहे. त्यामुळे पुण्याच्या प्रश्नांबाबत राज ठाकरे सत्ताधारी भाजपचा काय समाचार घेणार, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
आज बीडच्या भवितव्यासाठी मतदान होत आहे. वाईट प्रवृतींवर विजय मिळवण्यासाठी प्रभू वैद्यनाथचे दर्शन घेतले. प्रभू वैद्यनाथाच्या आशीर्वादाने बजरंग बप्पा बीडचे संकटमोचक ठरणार! pic.twitter.com/PObB2TLRzD
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) April 18, 2019