सदाशिवगडावर संवर्धनाचा नवा मापदंड कौतुकास्पद

त्वचाविज्ञान फाउंडेशनकडून सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानचा गौरव

कराड  – सदाशिवगडावर पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने देशात प्रथमच लोकवर्गणीतून सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानने गडाखालून सुमारे दोन किलोमीटर पाइपलाइनद्वारे पाणी नेले आहे. मावळा प्रतिष्ठानने या योजनेद्वारे नवीन मापदंड निर्माण केला असून सदाशिवगड संवर्धनासाठी सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही, कराड येथील त्वचाविज्ञान फाउंडेशन या सामाजिक संघटनेच्या सदस्य डॉक्‍टरांनी दिली.

सदाशिवगड पायरी मार्ग सुशोभीकरणासाठी डॉ. धनंजय चव्हाण, डॉ. मोहनराव काळे, डॉ. वर्षा जमाले, डॉ. बाळकृष्ण निकम, डॉ. आसमा हुसेन यांच्यासह त्वचाविज्ञान फाउंडेशनच्या अन्य सदस्य डॉक्‍टर यांनी पिंपळ, वड यांची 30 झाडे आणि संरक्षक जाळ्या भेट म्हणून दिल्या आहेत.
सदाशिवगड मावळा प्रतिष्ठान आणि शिवराय ट्रेकिंग ग्रुपचे सदस्य यांच्या उपस्थितीत मंगळवारी सकाळी पायरी मार्गालगत ही झाडे लावण्यात आली. त्यावेळी डॉ. धनंजय चव्हाण, डॉ. मोहनराव काळे, डॉ. वर्षा जमाले यांच्यासह अन्य सदस्य डॉक्‍टरांनी सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानच्या कार्याचा गौरव केला.

निःस्वार्थीपणे सदाशिवगड संवर्धनासाठी मावळा प्रतिष्ठानला सहकार्य करणाऱ्या शिवराय ट्रेकिंग ग्रुपच्या सदस्यांनी केलेल्या सहकार्याबाबत सर्व उपस्थितांनी भरभरून कौतुक केले.
डॉ. निश्‍चल श्रीवास्तव, डॉ. नमिता नारखेडे, डॉ. पुजा कणुमूरू, डॉ. राजीव शहा, डॉ. स्नेहल शेळके, डॉ. ध्रुव चव्हाण, डॉ. मानसी भट्ट, सौ. राजश्री चव्हाण, सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. योगेश कुंभार, प्रतिष्ठानचे सदस्य, शिवराय ट्रेकिंग ग्रुपचे सदस्य यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, व्यापारी तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)