चोरी करून जाळलेल्या बसचे गूढ उकलले

तिघे जेरबंद : लोणीकंद गुन्हे शोध पथकाची कारवाई

वाघोली – तुळापूर फाटा येथून टाटा कंपनीची बस अज्ञात चोरट्याने चोरून नेवून जाळून नुकसान केल्याप्रकरणी लोणीकंद गुन्हे शोध पथकाने तिघांना जेरबंद केले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. ही घटना दि. 24 जून रोजी घडली होती. याप्रकरणी लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये काळू मुकुंद शिंदे (वय 23, रा. शिक्रापूर, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली होती. गणेश लक्ष्मण घायाळ (वय 23, रा. पेरणे टोलनाक्‍याजवळ, लोणीकंद), गोपाळ लक्ष्मण घायाळ (वय 19, रा. लोणीकंद), मोहित संजय साळवे (वय 19, रा. धानोरे, मरकळ रोड, आळंदी), असे अटकेतील तिघांची नावे आहेत.

तुळापूर फाटा येथून बस चोरट्यांनी पळविली होती. त्यानंतर चोरट्यांनी ही बस जाळली. लोणीकंदच्या गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी जावून पाहणी केली. महिन्यांपासून गुन्ह्याचा कसून तपास करीत असताना दि. 19 रोजी खबऱ्यामाफर्त पथकाला खात्रीशीर माहिती मिळाली. याप्रकरणातील तीन आरोपींना अटक करण्यात आली. त्यांनी हे कृत्य अंतर्गत वादातून कट रचून केल्याचे कबूल केले. हवेलीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी, डॉ. सई भोरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी डी. बी. पथकाच्या मदतीने आरोपींना अटक केली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)