महिलेच्या गळ्यातील दागिने धुम स्टाईलने पळविले

नगर-औरंगाबाद रोडवरील इंद्रायणी हॉटेलजवळील घटणा

नगर: पतीसह रस्त्याने जात असताना मोटारसायकलवरील दोन अज्ञात इसमांनी महिलेच्या गळ्यातील दहा हजार रूपये किंमतीचा सोन्याचा पत्ता व मनी असे दागिने बळजबरीने हिसकावून धुम स्टाईलने चोरून नेले. ही घटना नगर-औरंगाबाद रोडवरील इंद्रायणी हॉटेलजवळ सोमवारी (दि.13) रात्री 12.30 च्या सुमारास घडली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, सोमनाथ मारूती गायकवाड (वय 23, रा. कारखेल खुर्द, ता. आष्टी, जि. बीड, हल्ली रा. सह्याद्रीचौक, एमआयडीसी, नगर ) हे त्यांच्या पत्नीसह नगर-औरंगाबाद रोडवरील इंद्रायणी हॉटेलजवळून जात असताना दोन अज्ञात इसमांनी मोटारसायकलवरून येऊन त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओरडबून तोडून काढले व धुम स्टाईलने तेथुन पळ काढला.

रात्रीची वेळ असल्याने रस्ता तसा निर्मनुष्यच असल्याने ते पती-पत्नी जास्त प्रतिकार करू शकले नाहीत. सध्या नगर शहर व परिसरात दिवसेंदिवस एकट्या दुकट्या महिलेस रस्त्यात गाठून धुम स्टाईलने चोरी करण्याचे सत्र दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. शहरातील चोरांवर पोलीसांचा वचक कमी झाल्याचे या घटनांमधून दिसुन येत आहे.
या प्रकरणी सोमनाथ गायकवाड यांच्या फिर्यादीवरून जबरी चोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास परिविक्षाधिन पोलीस उपनिरीक्षक बेंडकोळी हे करीत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)