आशियाई कुस्ती अजिंक्‍यपद स्पर्धेत भारताच्या बजरंग पुनियाने पटकावले सुवर्णपदक

दोहा – भारताच्या बजरंग पुनियाने आशियाई कुस्ती अजिंक्‍यपद स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या बजरंगने 65 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात कझाकस्तानच्या सायात्बेक ओकासोव्हचा 12-7 असा पराभव केला. विशेष म्हणजे पहिल्या फेरीत बजरंग 2-5 असा पिछाडीवर होता. त्याने जोरदार कमबॅक करताना सुवर्णपदकावर पकड घेतली.

अंतिम फेरीच्या सामन्यात पहिल्या मिनिटाला बजरंग 0-4 असा पिछाडीवर गेला. ओकासोव्हने पहिल्या फेरीत 5-2 अशी आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत बजरंगला आणखी धक्का बसला आणि तो 2-7 असा पिछाडीवर फेकला गेला. एका मिनिटाचा कालावधी असताना बजरंगने ओकासोव्हची धोबीपछाड करताना पिछाडी 4-7 अशी कमी केली. अखेरच्या डावात बजरंगने 12-7 अशी आघाडी घेत विजय मिळवला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)