सनी देओल यांचा भाजपत प्रवेश; पंजाब मधून लढवणार निवडणूक

नवी दिल्ली – हिंदी चित्रपट अभिनेते सनी देओल यांनी आज भारतीय जनतापक्षात प्रवेश केला. दिल्लीत झालेल्या या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन आणि रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. काहीं दिवसांपुर्वी त्यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली होती त्याच वेळी त्यांचा भाजप प्रवेश निश्‍चीत झाला होता.

त्यांनतर प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की माझे वडिल धर्मेंद्र हे ज्या प्रमाणे अटलीजींशी जवळीक साधून होते त्याच प्रमाणे मीही मोदींसाठी काम करण्यासाठी आलो आहे. भाजप हे माझे कुटुंब असून या कुटुंबासाठी जे काहीं करता येणे शक्‍य आहे ते मी करणार आहे असे त्यांनी नमूद केले. त्यांना पक्षातर्फे पंजाबातील गुरुदासपुर किंवा चंदीगड या मतदार संघातून उमेदवारी दिली जाण्याची शक्‍यता आहे.

गुरूदासपुर मतदार संघातून भाजपच्यावतीने या आधी अभिनेते विनोद खन्ना हे निवडून येत असत. सनी देओल भाजपत स्वागत करताना निर्मला सीतरामन म्हणाल्या की जेव्हा सनी दओल हे आमच्या पक्षात येण्यास तयार आहेत असे समजले त्यावेळी आम्हाला त्यांचा बॉर्डर हा चित्रपट आठवला. या चित्रपटातून त्यांनी राष्ट्रप्रेम आणि देशभक्तीचे अभुतपुर्व दर्शन घडवले आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. मोदींच्या नेतृत्वामुळे ते प्रभावीत झाले असून त्यांना स्वताला लोकांची नस चांगली माहिती आहे असेही सीतारामन यांनी नमूद केले.

सनी देओल यांच्या सावत्र मातोश्री हेमामालिनी या मथुरेतील खासदार असून त्या पुन्हा सध्या तेथून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. स्वता धर्मेंद्रही भाजपचे एक काळ खासदार राहिले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.