व्हॉटसऍपसाठी खास टिप्स…

व्हॉटसऍप हे इतर मॅसेजिंग ऍपपैकी सर्वात लोकप्रिय असं स्मार्टफोन ऍप आहे. आपल्यापैकी बरेच जण दररोज व्हॉटसऍपचा वापर करत असतात. मागील काही वर्षात व्हॉटसऍपमध्ये अनेक डेव्हलपमेंट (सुधारणा) झाल्या आहेत. या मॅसेजिंग ऍपमध्ये फक्त मॅसेजच नाही तर कॉनटॅक्‍ट,लोकेशन,फाईल्स, फोटो आणि व्हिडिओ इत्यादी शेअर करता येतात. पण तुम्हाला माहितेय का, बाय डिफॉल्ट व्हॉटसऍपवर तुम्हाला इतरांनी पाठवलेले फोटो आणि व्हिडिओ हे डायरेक्‍टली डाउनलोड होतात त्यामुळं तुमच्या स्मार्टफोनचे स्टोरेज लवकर भरल्याने तुमचा स्मार्टफोन (ऍन्ड्राईड/आयफोन) स्लो होतो.

जर तुम्ही या कारणांमुळ त्रस्त आहात तर यासाठी तुम्हाला तुमच्या व्हॉटसऍपच्या सेटिंगमध्ये थोडा बदल करावा लागेल. तर तुम्हाला आम्ही सांगणार आहोत कशाप्रकारे तुम्ही तुमच्या व्हॉटसऍपमध्ये मीडिया फाईल्स फोनच्या गॅलरीमध्ये सेव्ह होण्यापासून म्हणजेच फोनच्या स्टोरेजमध्ये फाईल्स डाउनलोड न होऊ देता स्टोरेज भरण्यापासून रोखू शकता.

ऍन्ड्राईड स्मार्टफोन यूजर्ससाठी
प्रथम व्हॉटसऍप सुरू करा.
यानंतर उजव्या बाजूला दिसणा-या तीन डॉटवर क्‍लिक करा.
येथे तुम्हाला सेटिंग्स पर्याय दिसेल.
सेटिंग्सवर क्‍लिक केल्यानंतर चॅट या पर्यायावर क्‍लिक करा.
मीडिया व्हिजिबिल्टी हा पर्याय ऑफ करा.

जर तुम्हाला मोजक्‍याच चॅट करिता ही सेटिंग करायची असेल तर या स्टेप्स वापरा
सर्वात प्रथम व्हॉटसऍप चालू करा.
यानंतर ज्या चॅट (यूझर्स/ ग्रुप) करिता तुम्हाला सेटिंग करायची त्यावर क्‍लिक करा.
उजव्या बाजूला दिसणाऱ्या तीन डॉटवर पर्यायावर क्‍लिक करा.
तुम्हाला तिथे व्हयू कॉनटॅक्‍ट (ग्रुप असेल तर ग्रुप इन्फो) पर्याय दिसेल, त्यावर क्‍लिक करा.
यानंतर मीडिया व्हिजीबिल्टी पर्याय दिसेल, त्यावर क्‍लिक करा.
क्‍लिक केल्यानंतर तुम्हाला तीन पर्याय उपलब्ध होतील. ‘डिफॉल्ट येस’, ‘येस’ आणि ‘नो’ यापैकी योग्य पर्याय निवडा.

आयफोन यूझर्स करिता
सर्वात प्रथम व्हॉटसऍप सुरू करा.
खालच्या बाजूला उजवीकडे दिसणाऱ्या सेटिंग्स पर्यायावर क्‍लिक करा.
यानंतर चॅट वर जा.
चॅटवर क्‍लिक केल्यानंतर सेव्ह टू कॅमेरा रोल (save to camera roll) पर्याय मिळेल, तो ऑफ करा.

अशाप्रकारे वर सांगितल्याप्रमाणे सेटिंग्समध्ये बदल केल्यास व्हॉटसऍपव्दारे मीडिया फाईल्स आपोआप डाउनलोड होणार नाहीत.

– स्वप्निल हजारे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)