साऊदॅम्प्टन – 12व्या विश्वचषक स्पर्धेतील भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरूध्द होत आहे. तत्पूर्वी दक्षिण आफ्रिकेने टाॅस जिंकला असून प्रथम फलंदाजी स्विकारली आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या अंतिम संघात हाशिम आमलाचे पुनरागमन झाले आहे. तसेच दोन्ही संघाने आपल्या अंतिम संघात दोन फिरकीपटू गोलंदाजाना स्थान दिले आहे. भारतीय संघाने कुलदीप यादव आणि चहलचा संघात समावेश केला आहे.
दोन्ही संघाचे अंतिम 11 खेळाडू खालीलप्रमाणे –
दक्षिण आफ्रिका –
क्विंटन डी कॉक, हाशिम आमला, फाफ डू प्लेसी, डेविड मिलर, रैसी वैन डर डुसेन, जेपी डुमिनी, एन्डिले फेहलुकवेओ, क्रिस मॉरिस, कगिसो रबाडा, इमरान ताहिर, तबरेज़ शम्सी
Match 8. South Africa XI: Q de Kock, H Amla, F du Plessis, R van der Dussen, D Miller, JP Duminy, A Phehlukwayo, C Morris, K Rabada, I Tahir, T Shamsi https://t.co/Ehv6d9cOXp #SAvInd #CWC19
— BCCI (@BCCI) June 5, 2019
भारत –
रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, के एल राहुल, केदार जाधव, एमएस धोनी, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, युज़वेंद्र चहल, जसप्रीत बुमराह
Match 8. India XI: S Dhawan, R Sharma, V Kohli, KL Rahul, K Jadhav, MS Dhoni, H Pandya, B Kumar, K Yadav, Y Chahal, J Bumrah https://t.co/Ehv6d9cOXp #SAvInd #CWC19
— BCCI (@BCCI) June 5, 2019
दरम्यान, भारतीय संघात उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे. त्यातच संघातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या मधल्या फळीतील फलंदाजांना विश्वचषक स्पर्धेपुर्वीच लय गवसली असल्याने भारतीय संघ समतोल आणि बलाढ्य झाला आहे. तर, दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेच्या संघाला यंदाच्या स्पर्धेत आपले पहिले दोन्ही सामने गमवावे लागल्याने त्यांचा संघ चांगलाच दबावात सापडलेला असुन त्यांच्यावरील दबावाचा फायदा भारतीय संघ कशा प्रकारे उचलतो हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.