#CWC19 : दक्षिण आफ्रिकेला मिळाला पहिला विजय

लंडन – गोलंदाज आणि फलंदाजांनी केलेल्या आक्रमक कामगिरीच्या बळावर शुक्रवारी झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा नऊ गडी आणि 116 चेंडू राखून पराभव करत यंदाच्या विश्‍वचषक स्पर्धेतील आपला पहिला विजय नोंदवला. विश्‍वचषक स्पर्धेत पाच सामने खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा हा पहिलाच विजय असून त्यांच्या खात्यावर दोन गुण जमा झाले असून दक्षिण आफ्रिकेचा संघ गुणतक्‍त्यात नवव्या स्थानावर आहे.

नाणेफेक जिंकूण प्रथम गोलंदाजी करत आफ्रिकेने अफगाणिस्तानचा डाव 34.1 षटकांत सर्वबाद 125 धावांत संपुष्टात आणला. प्रत्युत्तरात खेळताना आफ्रिकेने हे आव्हान केवळ 28.4 षटकांत एका गड्याच्या मोबदल्यात 131 धावा करत पूर्ण करत सामन्यात विजय आपल्या नावे केला.

अफगाणिस्तानचा संघ पहिल्या चेंडू पासूनच दबावात होता. त्याचा फायदा घेत आफ्रिकेने टिच्चुन मारा केला. त्यामुळे अफगाणिस्तानचे सलामीवीर सावध फलंदाजी करण्याला प्राधान्य देत होते. यावेळी सलामीवीर हझरतुल्ला झईझई आणि नूर आली झारदान यांनी 8.2 षटकांत 39 धावांची सलामी दिल्यानंतर 22 धावा करुन झईझई परतला. झईझई बाद झाल्यानंतर आलेला रेहमत शाह 6 तर हशमतुल्ला शहिदी 8 धावा करुन परतल्याने चांगल्या सुरूवातीनंतर आलेल्या दबावामुळे सावध खेळी करणार सलामीवीर नूर अली झारदान 32 धावा करुन परतल्याने अफगाणिस्तानची 4 बाद 69 अशी अवस्था झाली.

झारदान बाद झाल्यानंतर इतर अफगाणिस्तानी फलंदाजांनी केवळ मैदानावर हजेरी लावण्याचीच भूमिका घेतल्याने अफगाणिस्तानचा डाव सावरलाच नाही. यावेळी रशिद खानने फटकेबाजी करत अफगाणिस्तानला शंभरी ओलांडून दिली. यावेळी सलामीवीर झईझई आणि झारदान व्यतिरीक्त केवळ रशिद खाननेच दुहेरी धावा केल्या. या तिघांव्यतिरीक्त आठ फलंदाज एकेरी धावांमध्येच परतल्याने अफगाणिस्तानला केवळ 125 धावांचीच मजल मारता आली. यावेळी रशिदने सर्वाधिक 35 धावा केल्या. तर आफ्रिकेच्या इम्रान ताहिरने 4, ख्रिस मॉरिसने 3, फुलुकवायोने 2 तर रबाडाने 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेने अवघा एक गडी गमावत 131 धावा करून निर्विवाद विजय मिळविला. दक्षिण आफ्रिकेकडून हाशिम आमलाने नाबाद 41 धावा केल्या तर अँडिले फेहलूकवायोने नाबाद 17 धावा केल्या. क्विंटन डी कॉकने 68 धावा केल्या. त्यात चार चौकारांचा समावेश आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here