‘भैरवनाथ’च्या माध्यमातून समाजहिताची कामे

शिरूर – भैरवनाथ पतसंस्थेच्या माध्यमातून समाजातील गोरगरीब, गरजू व्यावसायिक उद्योजकांचे उद्योग वाढले पाहिजे, यासाठी त्यांना आर्थिक मदतीचा हात देत आहे. त्याचबरोबर पतसंस्थेच्या माध्यमातून समाजहिताची कामे केली जात असल्याचे प्रतिपादन भैरवनाथ पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष, माजी खासदार, शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्‍त केले.

शिरूर रेव्हेन्यू कॉलनी येथे भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या पंधराव्या शाखेचा शुभारंभ माजी खासदार आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरूरच्या नगराध्यक्ष वैशाली वाखारे होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ज्ञानेश्‍वर माऊली कटके, संपदा बॅंकेचे अध्यक्ष प्रभाकर डेरे, कल्पनाताई आढळराव पाटील, शिरुर शिक्षण प्रसारकचे अध्यक्ष सुकुमार बोरा, शिवसेना नेते अरुण गिरे, जिल्हा उपप्रमुख अनिल काशीद, रवींद्र करंजेखेले, तालुकाप्रमुख पोपट शेलार, गणेश जामदार, शहर प्रमुख संजय देशमुख, नगरसेविका अंजली थोरात, आरपीआयचे शहर अध्यक्ष निलेश जाधव, बापूसाहेब शिंदे, किरण देशमुख, रोहिदास शिवले, विजया टेमगिरे, शैलजा दुर्गे, देवीदास दरेकर, रोहिदास शिवले, नगरसेवक नितीन पाचर्णे, अभिजीत पाचर्णे, विठ्ठल पवार, सुनिता कुरंदळे, संगीता मल्लाव, उज्ज्वला बरमेचा, मयुर थोरात, अनिल पवार, संचालक रामशेठ गावडे, हनुमंत तागड, अभिमन्यू लांडगे, भिकाजी बोकड, रामदास पवळे, राम तोडकर, शिवाजीराव ढोबळे, किसन भालेराव, महेश ढमढेरे, योगेश बाणखिले, शोभा आवटे, अशोक गव्हाणे उपस्थित होते.

आढळराव पाटील म्हणाले की, तीस ते पस्तीस वर्षांपूर्वी ग्रामीण भागात छोट्या- मोठ्या सावकाराकडून व्याजाने पैसे घेतल्यामुळे अनेक कुटुंब उद्‌ध्वस्त होत होते. त्यामुळे या कुटुंबांना मदतीचा हात द्यावा यासाठी भैरवनाथ पतसंस्थेचे संस्थेची उभारणी केली आहे. यातून समाजातील अनेक गोरगरीब उभे राहिले आहेत. अनेक उद्योगही उभे राहिले असल्याचा अभिमान आम्हा सर्वांना आहे. संस्था सामाजिक बांधिलकीचा वसा जपला असल्याचे नगराध्यक्ष वैशाली वाखारे यांनी सांगितले. यावेळी ज्ञानेश्‍वर माऊली कटके, शिरूर प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुकुमार बोरा यांची भाषणे झाली. सागर काजळे यांनी स्वागत केले. महेंद्र ढमढेरे यांनी आभार मानले.

कर्ज फेडल्यामुळे संस्थेला बळ
आढळराव पाटील म्हणाले की, छोटीशी सुरू केलेली भैरवनाथ पतसंस्था दोनशे ते अडीचशे कोटी रुपयांची झाली आहे. हे केवळ समाजातील गोरगरीब लोकांनी कर्ज घेऊन ते फेडले असल्यामुळे संस्था नावारूपास आली आहे. शिरूर शहरात मोठ्या प्रमाणात व्यापारीवर्ग असून त्यांच्यासाठी कर्ज ठेवी तसेच अशा प्रकारचे व्यवहार पतसंस्थेच्या माध्यमातून करून संस्थेच्या उभारणीत हातभार लावावा.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)