बिग बॉस मराठीच्या घरात अगदी पहिल्या दिवसापासून वादामुळे चर्चेत असलेली शिवानी सुर्वेची लवकरच घरात एन्ट्री होणार असल्याचे बोलले जात आहे. शिवानीचा राग, ती देत असलेल्या शिव्या यामुळे घरातले सगळे सदस्य वैतागले होते. महेश मांजरेकरांनी तिला वारंवार समजावूनही तिने स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवले नव्हते. तसेच आपणच कसे योग्य आहोत हेच दाखवून देण्याचा ती सतत प्रयत्न करत होती.
टास्क न खेळणं, बिग बॉसने दिलेली शिक्षा भोगण्यास नकार देणं, तसेच इतर स्पर्धकांशी फार उद्धटपणे वागल्यामुळे तिला बिग बॉसने घरातून बाहेर काढले होते. शिवानीने तिला घरातून बाहेर जायचे आहे असे बिग बॉसला सातत्याने सांगितले होते. तसेच जर त्यांनी तिला घरी सोडले नाही तर ती बिग बॉसवर कायदेशीर कारवाई करेल अशी धमकीही देत होती. अखेर तिला घरातून बाहरे काढण्यात आले. पण आता ती पुन्हा घरात एण्ट्री करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. आता या रविवारी शिवानीची एण्ट्री होणार की नाही हे तर लवकर कळेलच. दरम्यान, बिग बॉसच्या घरात शिवानीची एण्ट्री झाली तर नवीन मसाला प्रेक्षकांना पाहायला मिळेल यात काही शंका नाही. शिवाय रुपाली, वीणा आणि किशोरी यांचा KVR ग्रुप तुटल्याचा शिवानीला किती फायदा होतो. या सगळ्या प्रश्नाची उत्तरं या रविवारी मिळतील.