पालिका सभेत नगरसेवकांची हमरी-तुमरी

सातारा – सातारा पालिकेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचार्यांना वारसा हक्कानुसार नियुक्तीच्या मुद्द्यावरुन पालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांच्यात हमरी-तुमरी झाली.नगर विकास आघाडीचे नगरसेवक बाळासाहेब खंदारे यांनी चतुर्थ श्रेणी कर्मचार्यांना वारसा हक्काने नियुक्ती करण्यास मुख्याधिकारी गोरे टाळाटाळ करत असल्याचा आरोप केला.

त्यावर सातारा विकास आघाडीचे नगरसेवक निशांत पाटील यांनी संबंधित गोष्टीची फाईल शासनाकडे असल्याचे भाजपा नगरसेवक धनंजय जांभळे यांना तुम्हीच पाठपुरावा करा असे सांगितले. त्यावर खंदारे, जांभळे यांनी पाटील तुम्ही गांभीर्यपूर्वक काम करा. कर्मचार्यांची चेष्टा करु नका असे सांगताच दोन्ही बाजूनी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्याने काही काळ तणावाचे वातावरण झाले होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)