पोलीस परेड ते थेट रॅम्प वॉक…

पुणे – पुण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील यांनी “रिनिंग मिसेस इंडिया 2019′ हा सौंदर्य स्पर्धेचा किताब पटकावला आहे. देशभरातील महिलांना मागे सारत पाटील यांनी मान पटकावला.

प्रेमा पाटील या विशेष शाखेत सहायक पोलीस निरीक्षक आहेत. फेसबुकच्या माध्यमातून त्यांना सौंदर्य स्पर्धेची माहिती मिळाली आणि त्यांनी तयारी सुरू केली. पाटील यांना मैदानावर पोलीस परेडची सवय होती. मात्र, रॅम्पवर चालण्याचा त्यांना काही अनुभव नव्हता. त्यांना समस्या भेडसावत होती ती म्हणजे “हाय हिल्स’च्या चपलांची. मात्र, घरी आल्यानंतर त्यांनी रात्री या चपला घालून सराव केला. त्याचबरोबर नृत्य आणि आपल्या बुद्धीच्या बळावर त्यांनी यश मिळवले.

पाटील या मूळच्या कराडच्या असून त्यांचं शिक्षण एम.कॉम.पर्यंत झाले आहे. गेल्या 9 वर्षांपासून प्रेमा पाटील या पोलीस दलात कर्तव्य बजावत आहेत. सध्या त्या पुणे पोलीस दलातील विशेष शाखेत कर्तव्य बजावत आहेत. कर्तव्यासोबत समाज कार्याची आवड असल्याने प्रेमा पाटील एका सामाजिक संस्थेसोबत गरीब आणि गरजू मुलांना मदत करत असतात. पतीच्या प्रोत्साहनामुळे स्पर्धेत सहभाग घेतल्याचे त्यांनी या यशानंतर प्रतिक्रिया व्यक्‍त करताना सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)