सलमान लग्न कधी करणार, असा प्रश्न बॉलिवूडच्या प्रेक्षकांना गेल्या कित्येक वर्षांपासून पडला आहे. सलमान सध्या बॉलिवूडमधील् सर्वात एलिजिबल बॅचलर आहे. सलमानने नेहमीच लग्नाच्या बातम्यांना फाटा दिला आहे. आताही लग्नाचे अंदाज वर्तवले जायला लागल्यावर सलमानने ही शक्यताच फेटाळून लावली आहे. आता सलमानबाबत एक नवीन बातमी व्हायरल होते आहे. सलमानला आता सरोगसीच्या माध्यमातून पिता होण्याचे वेध लागले आहेत. त्याने त्याबाबतची तयारीही सुरू केली असल्याचे समजते आहे.
सलमानला लहान मुले खूप आवडतात. जर कधी भविष्यात लग्न केले तर मुले पैदा करण्यासाठीच करेन, असे सलमान पूर्वीही म्हणाला होता. पण भारतात काही वर्षांपूर्वी झालेल्या व्यवसायिक सरोगसी विरोधी कायद्यामुळे त्याला सरोगसीद्वारे पिता बनता येणार नाही. पण सलमान लग्नच करणार नाही, असे म्हणतो आहे. त्यामुळे त्याला सरोगसीचा आधार घेता येऊ शकेल. याच्या पूर्वी शाहरुख, आमिर, करण जोहर, एकता कपूर, तुषार कपूर सारखे सेलिब्रिटी सरोगसीद्वारे पालक बनले आहेत. आता याच मार्गावरून सलमान खानही जाण्याची शक्यता आहे. पण या बातमीत किती खरेपणा आहे, हे लवकरच समजेल.