सईदच्या अटकेने इतर संघटनांना काही फरक पडला नाही

अमेरिकेची पाकिस्तानवर टीका

इस्लामाबाद : पाकिस्तानचे अध्यक्ष इम्रान खान हे अमेरिका दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. त्यातच आता मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद याच्या अटकेने लष्कर-ए-तोयबा व त्याच्या इतर संघटनांना काहीच फरक पडला नसल्याची टीका अमेरिकेने केली आहे. अमेरिकेने पाकिस्तानची मदत दहशतवादाला खतपाणी घालत असल्याने बंद केली असताना इम्रान यांनी दौऱ्यावर निघण्यापूर्वी हाफिज याच्या अटकेची कारवाई केली होती.

ट्रम्प प्रशासनाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, हाफिज सईदला यापूर्वीही अटक करण्यात आली होती, पण त्यातून काही निष्पन्न झालेले नाही. पाकिस्तानकडून आम्हाला दहशतवाद्यांवर ठोस कारवाई हवी आहे, त्यांच्याकडून तात्पुरत्या रंगसफेदीची अपेक्षा नाही. संयुक्त राष्ट्रांनी जागतिक दहशतवादी घोषित केलेल्या हाफिज सईदला बुधवारी अटक करण्यात आली होती. त्याला अटक करण्याची ही सातवी वेळ होती. 2001 पासून त्याला अनेकदा अटक करण्यात आली, पण तरी त्याच्या कारवाया सुरूच राहिल्या. अधिकाऱ्यांनी सांगितले की, इतिहासाबाबत आमची दृष्टी स्वच्छ आहे. आम्ही कुठल्या भ्रमात नाही. पाकिस्तानी गुप्तचर संस्थांनी दहशतवाद्यांना नेहमीच मदत केली आहे हे आम्हाला माहिती आहे. पाकिस्तानने दहशतवादी गटांच्या मालमत्ता जप्त करून काही पावले उचलली आहेत पण ती जुजबी आहेत. हाफिज सईद याला नजरकैदेतही ठेवण्यात आले होते पण आता त्याला सातव्यांदा अटक केली आहे तरी दहशतवादी कारवाया मात्र थांबलेल्या नाहीत. या दहशवाद्यांवर खटले भरून पाकिस्तानने शाश्वत कारवाई करावी. यापूर्वी त्याला अटक करून काही फरक पडलेला नाही त्यामुळे आता आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. जैश ए महंमद, लष्कर ए तोयबा व हक्कानी नेटवर्क यांच्या कारवायांबाबत अजूनही अमेरिकेला चिंता आहे. पाकिस्तानी लष्कर व दहशतवाद्यांच्या संबंधांची गुप्तताही आता संपली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)