हिंजवडीत 25 ठिकाणी बसविणार सीसीटीव्ही

“स्मार्ट सिटी’ ः हिंजवडी इंडस्ट्रीयल असोसिएशनने केली होतीमागणी

पिंपरी – हिंजवडी येथील वाहतूकविषयक विविध समस्यांबाबत पॅन सिटी प्रकल्पातील सीटी सर्व्हेलन्स ऍण्ड स्मार्ट ट्रॅफिक कामकाजातंर्गत पोलीस आयुक्‍तांच्या सर्वेक्षणानुसार 25 चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहे. त्यासाठी 16 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. एमआयडीसीमार्फत निधी प्राप्त झाल्यानंतर अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

पालिकेच्या आयुक्‍त कक्षात पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड संचालक मंडळाची आठवी बैठक शुक्रवारी संपन्न झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. संबंधित काम टेक महिंद्रा लिमिटेड यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. हे काम करण्याबाबत हिंजवडी इंडस्ट्रीयल असोसिएशनतर्फे मागणी करण्यात आली होती.

काम पूर्ण करण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागणार आहे. संबधित कामामध्ये हिंजवडी परिसरातील चौकांचे सर्वेक्षण करून 25 ठिकाणे निश्‍चित करण्यात आली आहेत. त्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, ऑप्टिक फायबर केबल बसविण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्‍त पोलीस आयुक्‍तांनी गृह विभागाच्या निधीतून चाकण, तळेगाव एमआयडीसी क्षेत्राच्या स्मार्ट सिटीतील सीसीटीव्हीच्या कामकाजासाठी समावेश करण्याची सूचना दिली आहे.

हिंजवडी येथे वाहतूक कोंडीचा प्रश्‍न होता. वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी येथे विविध उपाययोजना केल्या. परिसरातील काही मार्गांवर एकेरी वाहतूक करण्यात आली. त्यामुळे वाहतूक कोंडीच्या प्रश्‍नावर बऱ्याच अंशी तोडगा सापडला आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यानंतर येथील वाहतूक कोंडीचे नियंत्रण तसेच वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्यास लक्ष ठेवणे शक्‍य होणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)