आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्ववभूमीवर भाजपतर्फे आज मध्यप्रदेशातील ४ लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपद्वारे जाहीर करण्यात आलेल्या या ४ उमेदवारांच्या यादीमध्ये २००८ मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांचा देखील समावेश असून पक्षातर्फे त्यांना भोपाळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
दरम्यान, मालेगाव स्फोटात बळी पडलेल्या युवकाच्या वडिलांनी साध्वी प्रज्ञा ठाकूर यानां उमेदवार म्हणून जाहीर केल्यानंतर त्यांच्याविरोधात अर्ज दाखल केला आहे. एन.आय.ए न्यायालयाने आजारी असल्यामुळे साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांची जामिनावर सुटका केली होती. त्या आजारी असताना निवडणूक कश्या लढऊ शकतात? असा प्रश्न उपस्थित करत त्यांच्याविरोधात अपील करण्यात आली आहे.
न्यायालयाने २००८ मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात प्रमुख आरोपींपैकी एक असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्यावरील ‘मोक्का’ हटवला असला तरी अजूनही त्यांच्यावर बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत सुनावणी सुरु आहे. भाजपतर्फे साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना देण्यात आलेल्या उमेदवारीचे समर्थन करण्यात आले असून भोपळाचे विद्यमान खासदार अलोक संजर यांनी याबाबत बोलताना सांगितले की, “काँग्रेस सरकारच्या काळात साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांचे नाव मालेगाव बॉम्बस्फोटांमध्ये गुंतविण्यात आले होते. मात्र आता काँग्रेसचा प्रभाव करून त्या अन्यायाचा बदला घेतला जाईल.”
Father of a victim in Malegaon blast has filed application against Sadhvi Pragya Thakur after she was declared BJP candidate from Bhopal. Application has questioned her candidature before NIA court citing her health which was one of the reasons in her bail application pic.twitter.com/fvaR6bUx3o
— ANI (@ANI) April 18, 2019