डेक्कन जिमखानाचा पूना क्‍लबवर दणदणीत विजय

पीवायसी-गोल्डफिल्ड-मांडके चषक क्रिकेट स्पर्धा

पुणे – पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पीवायसी-गोल्डफिल्ड-मांडके चषक या सर्वातजुन्या व अनोख्या निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत धीरज फतंगरे(98 धावा) व स्वप्निल फुलपगारे(76धावा) यांनी केलेल्या फलंदाजीसह मुकेश चौधरी(26-4) आणि आर्यन बांगले(21-3) यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर डेक्कन जिमखाना संघाने पहिल्या डावातील आपली आघाडी कायम राखत पूना क्‍लब संघावर एक डाव राखून 44 धावांनी विजय मिळवला.

डेक्कन जिमखाना येथील क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात डेक्कन जिमखाना संघाने पूना क्‍लबवर निर्विवाद वर्चस्व गाजवले. पहिल्या डावात काल डेक्कन जिमखाना संघ 27षटकात 2बाद 149धावा अशा सुस्थितीत होता. तत्पूर्वी काल प्रथम फलंदाजी करताना पूना क्‍लब 37षटकात 125धावावर संपुष्टात आला. याच्या उत्तरात डेक्कन जिमखाना संघाने 40षटकात 5बाद 278 धावा केल्या. पण त्यांचे 5गडी बाद झाल्याने डेक्कनची अंतिम धावसंख्या 253(वजा 25)झाली.

यात धीरज फतंगरेने 123 चेंडूत 98धावा व स्वप्निल फुलपगारेने 110 चेंडूत 76धावा यांनी तिसऱ्या गडयासाठी 160चेंडूत 115धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर शुभम नागवडेने 39चेंडूत 3चौकार व 4षटकारांच्या मदतीने 60धावा केल्या. शुभम नागवडे व स्वप्निल फुलपगारे यांनी चौथ्या गडयासाठी 61चेंडूत 78धावांची भागीदारी करून संघाला 128 धावांची आघाडी मिळवून दिली.

प्रत्युत्तरात दुसऱ्या डावात पूना क्‍लब संघ 20षटकात 7बाद 119धावाच करू शकला. पण त्यांचे 7 गडी बाद झाल्याने संघाची अंतिम 84धावा(वजा 35धावा)झाली. यात ऋषिकेश मोटकर नाबाद 42, यश नाहर 21, अकिब शेख 17, दर्शित लुंकड 15यांनी थोडासा प्रतिकार केला. डेक्कनकडून आर्यन बांगले(21-3), यश बांबोळी(14-1), आशय पालकर(7-1)यांनी सुरेख गोलंदाजी करत पूना क्‍लबला 119 धावांवर रोखले. त्यामुळे 128 धावांची आघाडी कमी करताना पूना क्‍लबला 84धावाच करता आल्याने डेक्कन संघाने एक डाव व 44धावांनी विजय मिळवला.

संक्षिप्त धावफलक –

पहिला डाव: पूना क्‍लब: 37 षटकांत सर्वबाद 125 (175-50धावा)(आशिष सूर्यवंशी 47, अकिब शेख 31, ओंकार आखाडे 30, ऋषीकेश मोटकर 24, यश नाहर 16, मुकेश चौधरी 26-4, प्रखर अगरवाल 42-2, आशय पालकर 30-1, धीरज फतंगरे 33-1, आर्यन बांगळे 37-1) वि. डेक्कन जिमखाना : 40 षटकांत 5 बाद 253 (278-25धावा) (धीरज फतंगरे 98, स्वप्निल फुलपगारे 76, शुभम नागवडे 60, आशय पालकर नाबाद 22, अभिषेक ताटे 11, धनराज परदेशी 45-2, विश्वा शिंदे 76-2, सौरभ यादव 58-1),

दुसरा डाव : पूना क्‍लब : 20 षटकांत 7 बाद 84 (119-35धावा)(ऋषिकेश मोटकर नाबाद 42, यश नाहर 21, अकिब शेख 17, दर्शित लुंकड 15, आर्यन बांगले 21-3, यश बांबोळी 14-1, आशय पालकर 7-1); सामनावीर-धीरज फतंगरे; डेक्कन जिमखाना एक डाव राखून 44 धावांनी विजयी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)