पुणे – ‘एनडीआरएफ’ची मदत पथके सज्ज

पुणे – पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास अथवा आपत्ती आल्यास एनडीआरएफची मदत पथके तयारीत आहेत. आपत्कालीन परिस्थितीमध्ये आदेश प्राप्त झाल्यानंतर तत्काळ घटनास्थळी पोहोचण्यास सज्ज आहेत, अशी माहिती एनडीआरएफ कडून जिल्हा प्रशासनास देण्यात आली आहे.

मान्सूनपूर्व तयारी बैठकीत ही माहिती देण्यात आली. एनडीआरएफकडून आपत्ती निवारण प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याबाबत जिल्हा नियंत्रण कक्ष यांच्याकडून कार्यवाही केली जाणार आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये लोकांच्या सुरक्षिततेची व्यवस्था करणे, शोध व बचाव कार्य यासाठी लागणाऱ्या उपकरणांची उपलब्धता याबाबत पूर्वतयारी करा, अतिवृष्टीमुळे रस्त्यावरील झाडे पडून विद्युत पुरवठा खंडित होतो.

परिणामी वाहतूक व्यवस्था कोलमडते. त्यासाठी पर्यायी रस्ताचा वापर करण्याबाबत उपाययोजना करणे, आपत्तीच्या काळात जखमी लोकांना प्राधान्याने रुग्णालयामध्ये हलविणे, तसेच रुग्णालयाच्या ठिकाणी जमावाला नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवणे, बाधीत झालेल्या भागामध्ये स्थावर मालमत्ता व मौल्यवान गोष्टींवर देखरेख ठेवणे आदी सूचना जिल्हा प्रशासनाकडून पोलीस व एनडीआरएफ यांना देण्यात आल्या आहेत. नदीपात्रालगत, पात्रातील झोपडपट्‌टया व इतर धोक्‍याच्या ठिकाणांचा अभ्यास करून योजना ठरविणे, नदीपात्रातील अतिक्रमणे काढण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)