चेन्नई – “नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला हिंदू दहशतवादी होता” असं वक्तव्य केल्याने कमल हसन यांना सातत्याने विरोधाचा सामना करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी अखिल भारतीय हिंदू महासभेनं जीवे मारण्याची धमकी दिली होती. तर एका प्रचारसभेदरम्यान, कमल हसन यांच्यावर अंडी आणि दगड फेकण्यात आले आली आहे. या विवादित वक्तव्यावर कमल हासन यांनी तामिळ भाषेत ट्विट केले आहे. ‘हिंदू’ हा शब्द मुघल आणि परकियांच्या आक्रमणाआधी हिंदू हा शब्द अस्तित्त्वातच नव्हता.’ त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटणार यात शंकाच नाही.
— Kamal Haasan (@ikamalhaasan) May 17, 2019
तत्पूर्वी, नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला हिंदू दहशतवादी होता असे वक्तव्य कमल हासन यांनी केले होते. त्यामुळे वादंग निर्माण झाला. त्यानंतर कमल हासन यांनी प्रत्येक धर्मात दहशतवादी असल्याचंही वक्तव्य केलं होतं. आता त्यांनी हिंदू हा शब्द मुघलांच्या परकियांच्या आक्रमणाआधी अस्तित्त्वातच नव्हता असे म्हटले आहे. यामुळे पुन्हा राजकीय वर्तुळात वादंग सुरु झाले आहे.