मराठवाड्यात पावसाची हजेरी : पुढील चार दिवस मुसळधार

पाठ फिरवलेल्या मान्सूनने देश व्यापला

ठिकठिकाणी रस्त्यावर साचले पाणी
पुण्यात पावसाने शुक्रवारी विजांच्या कडकडाटांसह हजेरी लावली. साडेआठ वाजेपर्यंत शहरात 1 मिमी तर लोहगाव परिसरात 17 मिमी पावसाची नोंद झाली. या पावसामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचले होते. शहराच्या मध्यवर्ती भागासह कोथरूड, वारजे, कर्वेनगर, कात्रज, येरवडा, औंध, लोहगाव, पाषाण, वडगावशेरी या भागांतही मुसळधार पाऊस झाला. दरम्यान, शिवाजीनगर, कसबापेठ, कोथरुड, येरवडा, हडपसर या भागांतील 10 ठिकाणी पावसामुळे रात्री झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, कोणतीही दुर्घटना घटल्याचे आढळून आलेले नाही, अशी माहिती अग्निशमन विभागाकडून मिळाली आहे.

 
पुणे – राज्यात मान्सून दाखल होवूनही पाठ फिरविलेल्या मराठवाड्यात अखेर पावसाला सुरवात झाली. तसेच मागील 5 दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाने शुक्रवारी (दि. 19) कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुन्हा हजेरी लावली. दरम्यान, नैऋत्य मोसमी (मान्सून) पावसाने आज संपूर्ण देश व्यापला असून मान्सूनच्या वाटचालीत चांगली प्रगती झाली आहे. त्यामुळे पुढील चार दिवस मुसळधार पावसाचे राहतील, अशी शक्‍यता हवामानशास्त्र विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

गेल्या 24 तासांत कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर विदर्भातील काही भागांत मुसळधार पाऊस झाला. तर आज दिवसभरात कोकण-गोव्यातील पणजी येथे सर्वाधिक 77 मिमी पावसाची नोंद झाली. विदर्भातील अमरावती, बुलढाणा, अकोला, वर्धा यासह मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, महाबळेश्‍वर, कोल्हापूर आणि अहमदनगर परिसरात चांगला पाऊस झाला. मात्र, घाटमाथा आणि धरणक्षेत्रात अजूनही पावसाला सुरवात झाली नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)