व्यवस्थापकाचा पिंपरीतील सिटीमॉलमधील पैशांवर डल्ला

पिंपरी – शहरात प्रसिध्द सिटी मॉलमध्ये व्यवस्थापकानेच मॉलमधील पैशावर डल्ला मारल्याचे उघड झाले आहे. रोख रक्कम आणि विविध प्रकारचे कपडे असा एकूण 7 लाख 38 हजार 766 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी या व्यवस्थापका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी दत्तात्रय अशोक अलमेर (वय 36, रा. वाढेबोलाई, ता. हवेली) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मॉलमधील व्यवस्थापक दानिश खान (वय 26, रा. पंचवटी पाषाण, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दानिश हा पिंपरीतील सिटी मॉलमध्ये व्यवस्थापक या पदावर कार्यरत होता. त्याने 1 फेब्रुवारी ते 8 एप्रिल 2019 या दोन महिन्यांच्या कालावधीत मॉलमधील रोख 1 लाख 99 हजार 359 रुपये आणि मॉलमधील जर्किंग, जिन्स, टी -शर्ट असे वेगवेगळे 193 प्रकारच्या कपड्यांचा ऐवज मिळून एकुण 7 लाख 38 हजार 766 रुपयांचा अपहार केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)