पांडुरंगा, मराठवाड्यात पाऊस पडू दे; टोपेंची प्रार्थना

पंढरपूर – भागवत धर्माची पताका फडकावीत टाळ, मृदुंगाचा गजर व हरिनामाचा जयघोष करीत पांडुरंगावरील अतूट श्रद्धा व संतांचे पायी विश्‍वास ठेवून आषाढी वारीने पंढरीस निघालेला वैष्णवांचा मेळा पंढरपूरजवळ टप्पा येथे पोहोचला. यावेळी माजी शिक्षण मंत्री आणि आमदार राजेश टोपे यांच्याशी दैनिक प्रभातने खास संवाद साधला.

राजेश टोपे म्हणाले, मी गेल्या सतरा वर्षांपासून वारीला न चुकता येतो. जेव्हा वारीतील दिंड्यांना भेटी देतो तेव्हा नागरिकांना खूप समाधान मिळते. नागरिकांच्या समाधानातच माझे समाधान आहे. वारीत आल्यावर आनंद-समाधान मिळते. यावर्षी दुष्काळाने हवालदील झालेल्या माझ्या मराठवाड्यात पांडुरंगा पाऊस पडू दे. त्यांना सुखी-समाधनी कर, अशी प्रार्थना विठुरायाच्या चरणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)