पाकिस्तानने केली १०० भारतीय कैद्यांची सुटका

अटारी – पाकिस्तानने शुक्रवारी ३६० भारतीय कैद्यांची सुटका करण्याची घोषणा केली होती. त्या नुसार पाकिस्तानने आज ३६० पैकी १०० कैद्यांची सुटका केली असून, त्यांनी अटारी-वाघा सीमेवरुन भारतात प्रवेश केला.

चालू महिन्यात चार टप्प्यांत भारतीय कैद्यांची सुटका केली जाणार असल्याची माहिती पाकिस्तानी परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते मोहम्मद फैसल यांनी दिली होती. सध्या पाकिस्तानी तुरूंगांमध्ये ५३७ भारतीय कैदी आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील सागरी सीमेची स्पष्ट आखणी झालेली नाही. त्यातून एकमेकांची सागरी हद्द ओलांडल्याच्या आरोपावरून दोन्ही देशांकडून परस्परांचे नागरिक असणाऱ्या मच्छिमारांना अटक केल्या जाण्याच्या घटना वारंवार घडतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)