कोईमतूर येथे १ करोड २ लाख २६ हजार ४१७ रुपयांची रोकड जप्त

कोईमतूर – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या पैशांचा पाऊस पडत असल्याचे दिसून येत आहे. कोईमतूर पोलिसांनी आज कारवाई करत १ करोड २ लाख २६ हजार ४१७ रुपयांची रक्कम जप्त केली आहे.

पोलिसांना नाकाबंदी दरम्यान एवढी मोठी रक्कम आदळून आढळल्याने, पोलिसांनी सदर रकमेबाबत विचारपूस करून वैध कागदपत्रे सादर करण्यास सांगितले. मात्र असमर्थता दर्शविल्याने पोलिसांनी कारवाई करत ही रक्कम जप्त केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.