वेगवेगळ्या अपघातांत एक ठार, दोन गंभीर जखमी

जामखेड: पहिला अपघात पहाटे सौताडा घाटात घडला. यामध्ये ब्रीजा गाडी उलटली. या अपघातात योगेश लक्ष्मण चव्हाण (वय 35) याचा मृत्यू झाला. ते जामखेडकडून बीडकडे जात असताना यांच्या गाडीचा अपघात झाला. त्यांच्यासोबत असलेले शिवाजी खंडू कुलाळ (वय 38) हे गंभीर जखमी झाले. यानंतर सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी व गाडीचे चालक महेश मोहोळकर व डॉ. गीते यांनी जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

दुसरा अपघात दुपारी बारा वाजता जामखेड शहरातील कोठारी पेट्रोल पंपासमोर घडला. मोटर सायकलला एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने रोहिदास माळी व महादेव माळी हे जखमी झाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)