नुसरत जहॉंचे फतव्यांना सडेतोड उत्तर

दारूल उलूम देवबंद संघटनेने फतवा जारी केला होता

नवी दिल्ली : अभिनेत्री नुसरत जहॉं तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार झाल्यानंतर त्यांच्यामागील शुक्‍लकाष्ठ काही संपेना. नुसरत यांनी हिंदू व्यक्तीशी विवाह केल्यानंतर आणि गळ्यामध्ये मंगळसूत्र, कपाळावर सिंदूर लावले होते. नुसरत यांनी याच गेटअपमध्ये संसदेत उपस्थित राहिल्या होत्या. यानंतर त्यांच्याविरोधात दारूल उलूम देवबंद या संघटनेने फतवा जारी केला होता. यावर नुसरत यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्या म्हणाल्या की, “मी असल्या गोष्टींकडे लक्ष देत नाही. मला माझा धर्म माहित आहे. मी जन्मापासूनच मुस्लीम आहे आणि आताही मुस्लीमच आहे. ही आस्था किंवा धर्माबाबतचा विश्वास तुमच्या हृदयात असावा लागतो, डोक्‍यात नव्हे.’ यापुर्वी, नुसरत यांनी ट्‌विटरवरून आपली भूमिका मांडली होती. नुसरत म्हणाल्या होत्या- “मी जात, पंथ आणि धर्माच्या पलीकडे सर्वसमावेशक विचारांच्या भारताचे प्रतिनिधित्व करते. मी सर्व धर्मांचा आदर करते. यापुढेही मी मुस्लीमच राहीन आणि इतर कोणालाही मी काय कपडे घालावे, हे सांगण्याचा अधिकार नाही. धर्मावरील विश्वास हा तुमच्या कपड्यावरून ठरत नाही’.

नुसरत जहॉं या लोकसभा निवडणुकीत पश्‍चिम बंगालच्या बशीरहाट मतदार संघातून तृणमूल कॉंग्रेसच्या तिकीटावर निवडून आल्या आहेत. संसदेत शपथविधीवेळी नुसरत या कपाळावर सिंदुर आणि साडी नेसून आल्या होत्या. त्यामुळे त्यांचा हा चर्चेचा विषय बनला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)