लीड्स – जिद्दीने खेळणाऱ्या अफगाणिस्तानने वेस्ट इंडिजला कौतुकास्पद झुंज दिली. तथापि हा सामना 23 धावांनी जिंकून विंडीजने शेवट गोड केला.
झंझावाती खेळाबद्दल ख्यातनाम असलेल्या ख्रिस गेल याच्याकडून नेहमीच्या धडाकेबाज खेळीची अपेक्षा होती. त्याचा कारकिर्दीतील अखेरचा सामना होता. मात्र, दौलत झारदान याने त्याला केवळ 7 धावांवर बाद करीत विंडीजला धक्का दिला. त्यामुळे चाहत्यांची निराशाच झाली. गेल याने बॅट उंचावत प्रेक्षकांना अभिवादन करीत तंबूचा रस्ता घेतला.