भाजपाचे मित्रपक्ष कमी होणार-अखिलेश

कन्नौज – भाजपचे मित्रपक्ष एकेक करून त्यांना सोडून चालले आहेत. चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाने मार्च महिन्यातच भाजपला सोडचिठ्ठी दिली. बिहारमध्ये उपेंद्र कुशवाह यांनी भाजपची साथ सोडली. आसाममध्ये आसाम गण परिषदेने त्यांची साथ सोडली आहे. भाजपा त्याच्या मित्रपक्षाना चांगली वागणून देत नसल्याचे यातून स्पष्ट होते. त्याचबरोबर भाजपाच्या पायाखालची वाळू आता घसरत असल्याचे त्याच्या मित्रपक्षांना वाटत असल्याचे सपाचे नेते अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.

त्याचबरोबर उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाज पार्टी (बसपा) आणि समाजवादी पार्टी (सपा) हे एकत्र येण्यास भाजप कारणीभूत आहे, असे सपाचे नेते यादव यांनी यावेळी म्हटले आहे. ते म्हणाले की, भाजपाची काम करण्याची अयोग्य पद्धत पाहून आम्हाला एकत्र यावे लागत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पत्नी डिंपल यादव यांच्या कन्नोज लोकसभा मतदारसंघात आयोजित मेळाव्यात अखिलेश यादव बोलत होते. ते पुढे म्हणाले, गेल्या वर्षी झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपचा तीन मतदार संघात पराभव झाला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मतदारसंघातही भाजपला अपयश आले. या तीन जागांवर आम्हाला मिळालेल्या यशामुळे भाजपला पराभूत करण्यासाठी आम्ही एकत्र येणे आवश्‍यक आहे, हे आमच्या लक्षात आले. त्यामुळे आम्ही एकत्र आलो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)