माझा बायोपिक म्हणजे अफवा – माधुरी

बायोपिकच्या ट्रेन्डमध्ये राजकीय नेते, बडे कलाकार, खेळाडू इथपासून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांवरील बायोपिकसुध्दा बॉक्‍स ऑफिसवर मस्त चालले आहेत. या मस्त चाललेल्या ट्रेन्डमध्ये आता “धक धक गर्ल’ माधुरी दीक्षितचाही बायोपिक येणार असे ऐकायला मिळाले होते. तिच्या पहिल्या सिनेमापासून करिअरमधील विविध टप्पे आणि वैयक्तिक आयुष्यातील वेगवेगळ्या घडामोडींचा परामर्श दाखवण्यात येणार असेही समजले होते.

पण स्वतः माधुरीने स्वतःच्या बायोपिकची कल्पनाच फेटाळून लावली आहे. असा कोणताही बायोपिक केला जाणार नाही आहे. “माझ्यावर बायोपिक होणे ही एक मोठी अफवा आहे. ही अफवा नक्की कोणी पसरवली आणि का पसरवली ते माहित नाही. पण माझ्यावर कोणीही बायोपिक बनवावा अशी माझी स्वतःची ईच्छाच नाही. कारण अजून करिअर संपलेले नाही. मला अजूनही बरेच काही करायचे आहे.’ असे माधुरीने स्पष्ट करून टाकले. बायोपिकसारख्या अफवांवर विश्‍वासच ठेवायला नको, हे देखील तिने स्पष्ट करून टाकले.

प्रियांका चोप्राच्या मदतीने माधुरीला आपल्या जीवनावर एक शृंखला करायची आहे. त्याची तयारी या दोघी मिळून करत आहेत, असेही ऐकिवात आले आहे. कदाचित ही शृंखला तिला वेबवर रिलीज करायची असेल. त्यानंतरच तिच्या बायोपिकला वास्तवात आणले जाऊ शकेल.

माधुरीचा बायोपिक आला तर त्यामध्ये अनेक गोष्टींचा अंतर्भाव असेल. त्यात संजय दत्तबरोबरचे अफेअर, अनिल कपूरबरोबरच्या अफेअरच्या अफवा, अचानक आणि गुपचूपपणे डॉ. श्रीराम नेने बरोबर केलेले लग्न, मराठीत पदार्पण करण्याचा अयशस्वी प्रयत्न आणि टिव्ही शोमधून डान्स शिकवण्याची धडपड या सगळ्या गोष्टी दाखवाव्या लागतील. “कलंक’ अलिकडेच येऊन गेला. त्यामध्ये तिला संजय दत्तबरोबर कित्येक वर्षांनी काम करायला लागले होते. त्यासाठीही तिने बरेच आढेवेढे घेतले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)