पारंपरिक राजकारण सोडून नव्या राजकीय प्रयोगाची गरज; मनसे नेत्याचा सल्ला

मुंबई – लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश संपादन करून सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यास नरेंद्र मोदी सज्ज झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात विरोधी पक्षांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी पारंपरिक राजकारण सोडून नव्या राजकीय प्रयोगाची गरज आहे. असे ट्विट मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलं आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरे यांची अनेक पक्षातील नेत्यांनी भेट त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये नव्या राजकीय प्रयोग दिसण्याची शक्यता राजकीय निरीक्षकांडून वर्तविली जात आहे.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत एकही उमेदवार उभा न करताना नरेंद्र मोदी व अमित शहा मुक्त भारताची हाक देत महाराष्ट्रात प्रचाराची राळ मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उठवली होती. “लाव रे तो व्हीडिओ’हे त्यांचे वाक्‍य चांगलेच गाजले होते. मात्र, प्रत्यक्षात राज ठाकरे यांच्या भाषणांमुळे मतांमध्ये परिवर्तन होऊ शकले नाही. महाराष्ट्रात शिवसेना-भाजपाच्या युतीपुढे त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूकीत आघाडीमध्ये मनसेलाही पारंपरिक राजकारण सोडून नव्या राजकीय प्रयोगाची गरज असल्याचे देशपांडेंनी सांगितले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.