नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत भाजपच्या लाटेमुळे काँग्रेसचे अक्षरश: पानिपत झाले आहे. निवडणुकीतील प्रभावाची जबादारी स्वीकारून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकारणी समितीच्या बैठकीत आपला राजीनामा सादर केला होता. त्यानंतर अनेकांनी राहुल गांधींची मनधरणी करण्याचे अनेक प्रयत्न केले होते. मात्र, तरी सुद्धा राहुल गांधी आपल्या राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम आहेत.
त्यानंतर सोनिया गांधींनी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना फोन केल्याची बातमी आली होती. पण आता काँग्रेस अध्यक्षांच्या निवडीमध्ये पुन्हा एकदा एका नव्या नेत्यांचे नाव पुढे येत आहे.
एका इंग्रजी माध्यमाने यासंबंधी वृत्त दिले आहे. काँग्रेस अध्यक्षांच्या नावावर जोपर्यंत सर्वांची सहमती होत नाही तोपर्यंत मोतीलाल व्होरा हे काँग्रेसचे हंगामी अध्यक्ष असतील. त्यामुळे आता काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये एक नवा टि्वस्ट आला असून काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेमकी कोणाची वर्णी लागेल हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.
कोण आहेत मोतीलाल व्होरा
मोतीलाल व्होरा हे 91 वर्षांचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारीही सांभाळली आहे.