टायगरला करायचाय मायकेल जॅक्‍सनचा बायोपिक

टायगर श्रॉफला बॉलिवूडमध्ये ऍक्‍शन हिरो बरोबर डान्सिंग स्टार म्हणूनही ओळखले जाते. त्याच्या डान्स स्टाईलचे शेकडो दीवाने आहेत. त्याचा डान्स करिअरला केवळ 6 वर्षे झाली आहेत. पण या सहा वर्षात तो दिवसरात्र डान्स प्रॅक्‍टिस करत राहिला आहे. त्याने जेंव्हा “हिरोपंती’ साईन केला होता, तेंव्हाच त्याला मायकेल जॅक्‍सनसारखे डान्स करायची महत्वाकांक्षा होती. “हिरोपंती’साईन करण्याच्या एक वर्ष आगोदरच त्याने डान्स शिकायला सुरुवात केली होती. तो हृतिक रोशनच्या डान्सचाही फॅन आहे. पण अजूनही त्याला डान्सर म्हणून मायकेल जॅक्‍सनचीच प्रेरणा आहे. म्हणूनच मायकेल जॅक्‍सनच्या बायोपिकमध्ये काम मिळावे, असे त्याला वाटते आहे.

लहानपणी शरीर लवचिक असल्याचा त्याला फायदा झाला. आता अंगात थोडा कठोरपणा आला आहे. याशिवाय टायगर स्वतः खूप लाजाळू आहे. हा स्वभाव दूर करायला त्याला वेळ लागला. अजूनही त्याच्या स्वभावात पूर्णपणे मोकळेपणा आलेला नाही. पण पहिल्यापेक्षा आता खूपच खुलल्याचे त्याला स्वतःला जाणवते आहे. सध्या बायोपिकचा ट्रेन्ड सुरू आहे. अनेकांनी मोठ्या व्यक्‍तींचे रोल साकारले आहेत. तशी आपल्याला संधी मिळाली, तर मायकेल जॅक्‍सनच्या रोल करायची संधी मिळावी, अशी त्याची ईच्छा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)