ममता बॅनर्जी यांना जोरदार धक्का; ६० नगरसेवक आणि दोन आमदार भाजपमध्ये

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना जोरदार धक्का बसला आहे. त्यांच्या तब्ब्ल ६० नगरसेवक आणि दोन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला.  लोकसभा निवडणुकीत भाजपने चांगली कामगिरी केली. २०१४ मध्ये फक्त दोन जागा जिंकणाऱ्या भाजपने यावर्षी ४२ जागांपैकी तब्बल १८ जागांवर विजय मिळवला. तर तृणमूल काँग्रेसने २२ जागा जिंकल्या.

भाजपाची यंदाची कामगिरी तृणमूल काँग्रेससाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. या पार्श्वभूमीवर आता तृणमूल काँग्रेसमधील नेतेमंडळी भाजपात प्रवेश करण्यास इच्छुक असल्याचे वृत्त आहे.

https://twitter.com/ANI/status/1133323364574015488

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)