स्वच्छ महाराष्ट्रासाठी विविध कंपन्यांकडून पुढाकार

मुंबई  – स्वच्छ महाराष्ट्रासाठी आता काही कंपन्या पुढाकार घेऊ लागल्या आहेत. आयुर्वेद उत्पादन निर्माता डाबर यांनी प्लॅस्टिक कचरा रिसायकलिंग उपक्रम योजना जाहीर केली. या उपक्रमाला महाराष्ट्र सरकारचे सहकार्य लाभत असून आता हे काम इतर कंपन्याही करण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या क्षेत्रात शिस्तबद्ध काम होण्यास मदत मिळणार आहे.

डाबर कंपनीने सन 2019-20 मध्ये 10,00,000 किलो पोस्ट-कंझ्युमर प्लॅस्टिक कचरा गोळा करूनच स्वच्छ महाराष्ट्रच्या दिशेने एक पाऊल उचलले आहे. या आर्थिक वर्षामध्ये डाबरने महाराष्ट्रातील सर्व शहरांमधून 10,00,000 किलोग्राम पोस्ट- कंझ्युमर प्लॅस्टिक कचरा या उपक्रमांतर्गत जमा करण्याचे योजिले आहे.

डाबर इंडियाचे कॉर्पोरेट कम्युनिकेशन प्रमुख व्यास आनंद म्हणाले की, एक मजबूत पर्यावरण धोरण, केवळ ब्रॅण्ड प्रतिष्ठा वाढवित नाही तर ग्राहक निष्ठा निर्माण करण्यासाठी देखील महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे यातून आम्हाला कोणताही महसूल मिळणार नसतांनाही आताही या कामासाठी भांडवल आणि मनुष्यबळ वापरणार आहोत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×