माही गिलने मान्य केले ‘लीव्ह इन रिलेशनशीप’

‘डेव डी’ आणि “साहेब, बिबी और गॅंगस्टर’ मधून दिसलेली माही गिल परत अचानक गायब झाली होती. सिनेमा आणि एन्टरटेनमेंट इंडस्ट्रीमधील गॉसिप फॅक्‍टरी किती वेगवान आहे, हे माहित असल्यामुळेच तिने आतापर्यंत स्वतःबाबतची वैयक्तिक माहिती कोणाला सांगितलेली नव्हती. ती स्वतःबाबत काहीही बोलत नव्हती. मात्र आता ती अचानक प्रकाशात आली, ते आपल्या कौटुंबिक स्थितीचा अपडेट सांगण्यासाठीच. माहीने आपल्या मनातून विवाहाचा विचारच रद्द करून टाकला आहे. ती सध्या एका उद्योगपतीबरोबर “लीव्ह इन रिलेशनशीप’मध्ये रहाते आहे आणि 3 वर्षांच्या मुलीची आई देखील झाली आहे, ही माहिती तिने प्रथमच मान्य केली.

गेल्या वर्षीही तिने एका इंटरव्ह्यूमध्ये आपल्या या बॉयफ्रेंडबाबतचा ओझरता उल्लेख केला होता. आपण त्याचे नाव सांगायला तयार आहोत. पण त्यालाच लाईमलाईटपासून दूर रहायचे आहे, म्हणून त्याचे नाव सांगणार नसल्याचे ती म्हणाली होती. तिच्या या बॉयफ्रेंडचे गोवा आणि जगभरात इतर ठिकाणी कसिनो आणि हॉटेल आहेत. जॉर्जियामध्ये त्याने हॉटेल उघडले तेंव्हापासून माही त्याच्याबरोबर आहे. तो जगभर प्रवास करत असतो. त्यामुळे माही आणि त्याची भेट केवळ तो गोव्यात आल्यावरच होते. त्याच्याबरोबर लग्न करायचे आहे. पण तोपर्यंतही काहीही फरक पडत नाही. लग्न करण्यासाठी आम्हा दोघांवरही कोणतेही प्रेशर नाही. आपल्यालाच स्वातंत्र्य आणि स्वतःची स्पेस असल्याचे त्याला सांगितले असल्याचेही माही म्हणाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

माहीची मुलगी वेरोनिका मुंबईमध्ये रहाते आहे. तिच्याबरोबर राहण्यासाठी माही नेहमीच उत्सुक असते. दरम्यान आपल्या बॉलिवूड करिअरबाबत मात्र तिच्याक्‍डे सध्या तरी सांगण्यासारखे काही नाही. “देव…’ आणि “साहेब, बिबी…’व्यतिरिक्‍त “नॉट अ लव्ह स्टोरी’ अणि “जंजीर’ सारख्या पूर्वीच्या 4-5 सिनेमांव्यतिरिक्‍त तिने अलिकडेच “अपहरण’ नावाच्या वेबसिरीजमध्येही काम केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)