कंगणाच्या “मेंटल…’चे नाव बदलले

कंगणाच्या “मेंटल है क्‍या’चे शिर्षक नुकतेच बदलले गेले आहे. हे नाव आता “जजमेंटल है क्‍या’ असे केले गेले आहे. हिंदी फिल्म इंडस्ट्रीमधील वशिलेबाजी आणि पॉवर प्ले मुळेच हे शिर्षक बदलण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. स्वतः कंगणानेच या सिनेमाच्या बदललेल्या शिर्षकाची माहिती दिली.

“कंगणा जेंव्हा जेंव्हा काही नवीन करायचे ठरवते. तेंव्हा त्याला विरोध केला जातो. लोक कंगणाच्या सर्व गोष्टींना आक्षेप घेतात. कारण मी त्यांच्यादृष्टीने आऊटसाईडर आहे. कंगणाला जर श्‍वास जरी घ्यायचा असेल, तरी लोकांचा त्याला आक्षेप असतो. मात्र आम्ही आऊटसाईडर्सनी त्या प्रत्येक समस्येवर तोडगा काढण्यात तयार झालो आहोत.’ असे कंगणा म्हणाली. कंगणाच्या “मेंटल है क्‍या’मधील “मेंटल’ या शब्दाला मानसोपचार तज्ञांनी अक्षेप घेतला होत्या. त्यामुलेच हे नाव बदलून “जजमेंटल है क्‍या’असे केले गेले आहे. पण “मेंटल’ या शब्दाला आक्षेप घेणऱ्यंनी आगोदर हे नाव खरेच आक्षेपार्ह आहे का, हे तपासून पहावे, असे कंगणा म्हणाली. सलमान खानच्या एका सिनेमाचे नावही “मेंटल’ होते. तेंव्हा मात्र विरोध केला गेला नाही. मात्र अगदी अलिकडेच “मेंटल’ या शब्दावर बंदी घातली गेली. त्यामुळे अगदी नाईलाजाने हा बदल करावा लागला.

सिनेमाचे नाव बदलले तरी आपल्या सिनेमामध्ये बदल करावा असे काहीच नाही. आपला सिनेमा खरच खूप सुंदर आहे. आपला हेतू स्पष्ट आणि शुद्ध आहे. केवळ शिर्षक बदलल्यामुळे काहीही फरक पडणार नाही, असे कंगणा म्हणाली.

“जजमेंटल…’ मध्ये कंगणाबरोबर राजकुमार राव, ब्रिजेंद्र काला, जिमी शेरगिल आणि अमयारा दस्तूर हे देखील असणार आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.