भाग्यश्रीच्या नवऱ्याला अटक

“मैने प्यार किया’ची भाग्यश्री अजूनही लोकांच्या स्मरणातून गेली नाही. पण त्या एकाच हिट सिनेमानंतर भाग्यश्रीने चित्रपट संन्यास घेतला. आता तिचा मुलगही सिनेसृष्टीमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. पण त्याचवेळी एक शॉकिंग न्यूज समजली आहे. तिचा नवरा हिमालय दासनीला अंबोली पोलिसांनी अटक केली आहे. एका गॅंबलिंग रॅकेटशी संबंधित असल्याच्या आरोपावरून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. हिमालय स्वतः बांधकाम व्यवसायिक आहे. पण ही जुगारीची सवय कधी आणि कुठून लागली, कोणास ठाऊक. पोलिसांनी हिमालयच्याबरोबर आणखी 15 जणांनाही अटक केली आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान हिमालय दासनीचे नावही पुढे आले आणि पोलिसांनी पश्‍चिम अंधेरीतील एका आलिशान मॉलच्या जवळच्या मोठ्या इमारतीवर छापाही घातला होता.

तिला तिच्या नवऱ्यामुळे सिनेमांमधून काम करणे बंद करायला लागले होते. “मैने प्यार किया’च्या सेटवर तो सलमानबरोबर आपल्या बायकोला बघू शकत नसे. तो तेथून उठून निघून जात असे. यमुळे भाग्यश्री खूप अस्वस्थ व्हायची. सिनेमाच्या उत्तरार्धामध्ये सगळा फोकस तिच्याऐवजी सलमानवरच ठेवण्यात आला होता. त्याचे कारणही तिच्या चेहऱ्यावर सातत्याने जाणवणरा नर्व्हसपणा हेच होते. तिला सिनेमा अर्ध्यातून सोडायचीही ईच्छा झाली होती. पण ते शक्‍य नव्हते.

शेवटी तिने पुढचे सिनेमे केवळ नवरा हिमालयबरोबर करायचे ठरवले होते. तिने “पायल’ सारखा एखादा सिनेमा हिमालयबरोबर केलाही होता. पण त्याला यश मिळाले नाही. आता हाच हिमालय भाग्यश्रीच्या मुलाच्या यशातही आडव येतो असे दिसते आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.