नाशिक – महाराष्ट्र ब्रीज असोसिएशनच्या वतीने आणि नाशिक जिल्हा ब्रीज असोसिएशन आणि मित्र विहार क्लब यांच्या सहकार्याने आणि ब्रीज फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या महाराष्ट्र राज्य समर लीग ब्रीज स्पर्धेत महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून प्रत्येकी दोन संघ सहभागी झाले असून यजमान नाशिकचे चार संघ सहभागी झाले होते या सर्व 34 संघामध्ये 56 सामने खेळविण्यात आल्यानंतर प्रत्येक संघाला सात सामने खेळावे लागले. या खेळलेल्या सामन्यांमध्ये प्रत्येक संघाला मिळालेल्या गुणांची बेरीज करण्यात आली आणि त्यानुसार गुणानुक्रमे पहिल्या आठ संघांना पुढील फेरीसाठी पात्र ठरविण्यात आले आहे.
या 56 सामन्यानंतर सुनील माचोर, ट्रिक्स, अमोल, डब्लू सी जी, पोद्दार हौसिंग, आबा ब्लू आणि नाशिकच्या केनसीगटन संघ आणि मित्र विहार : ब : संघ अश्या आठ संघांचा समावेश झाला आहे. नाशिकच्या केनसीगटन संघाकडून हेमंत पांडे. सूर्या रेडडी, डॉ. अतुल दशपुत्रे, अनिल पाध्ये, विनय देसाई आणि मनीष बहुगुणा या सहा खेळाडूंचा तर मित्र विहार ब : संघात जहांगीर इराणी, जे. आर. परांजपे, दिलीप गोसावी आणि डॉ. प्रशांत पुरंदरे याचा समावेश आहे.
आता या आठ संघामध्ये राऊंड रॉबीन पद्धतीने एकूण 28 सामने खेळविण्यात येणार आहेत. त्यानंतर या आठ संघामध्ये गुणानुक्रमे विजेता, उपविजेता आणि त्यानंतर तीन ते आठ क्रमांक ठरविले जातील.
पात्र झालेले पाहिले आठ संघ :-
1) सुनील माचोर संघ – ( 106. 09 गुण )
2) ट्रीक्स संघ – ( 89. 57 गुण )
3) अमोल संघ – ( 88. 68 गुण )
4) डब्लू. सी. एल. संघ – ( 87. 63 गुण )
5) पोद्दार हौसिंग संघ – ( 86 . 38 गुण )
6) केनसिंगटन संघ – ( 81. 83 गुण )
7) मित्र विहार :ब संघ ( 80. 54 गुण )
8) आबा ब्लू संघ – (80. 42. गुण )