भुवनेश्वर – धारदार आक्रमणाच्या जोरावर भारताने रशियाचा 10-0 असा धुव्वा उडविला आणि आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ आयोजित जागतिक मालिकेत धडाकेबाज प्रारंभ केला. पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेच्या पात्रतेसाठी ही स्पर्धा महत्वाची मानली जात आहे.
FT: 🇮🇳 10-0 🇷🇺
Team India are off with a bang 🔥 as they stunned Russia in their opening match by getting to the double digits!#IndiaKaGame #FIHSeriesFinals #INDvRUS #RoadToTokyo pic.twitter.com/93acc4O1Ei
— Hockey India (@TheHockeyIndia) June 6, 2019
एकतर्फी झालेल्या लढतीत भारताने वर्चस्व गाजविले तरीही खाते उघडण्यासाठी तेरा मिनिटे वाट पहावी लागली. भारताकडून हरमानप्रितसिंग (32 वे व 48 वे मिनिट) व आकाशदीपसिंग (41 वे व 55 वे मिनिट) यांनी प्रत्येकी दोन गोल केले. नीलकांत शर्मा (13 वे मिनिट), सिमरनजितसिंग (19 वे मिनिट), अमित रोहिदास (20 वे मिनिट), वरुणकुमार (33 वे मिनिट), गुरसाहिबजितसिंग (38 वे मिनिट), विवेक सागर प्रसाद (45 वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल करीत त्यांना चांगली साथ दिली.
साखळी गटांत भारतासह रशियाबरोबरच पोलंड, उजबेकिस्तान यांचा समावेश आहे.
साखळी गटातील दुसऱ्या सामन्यात भारताची पोलंडशी गाठ पडणार आहे. पोलंडने पहिल्या सामन्यात उजबेकिस्तानवर 4-0 असा विजय मिळविला.