पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे “वायसीएम’ व अन्य रुग्णालयांमध्ये उपचार घेत असताना मृत्यू झाल्यास, संबंधित रुग्णाचे संपूर्ण बिल माफ करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. ऐनवेळी मांडलेल्या या विषयाला मान्यता दिली आहे.
पिंपरी महापालिकेच्या वतीने वायसीएमबरोबरच विविध भागांत रुग्णालये चालविली जातात. रुग्णालयांमध्ये शहराबरोबरच ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांवर अत्यल्प दरात उपचार केले जातात. बहुतांशी रुग्णांची आर्थिक स्थिती बेताची असते. अशातच रुग्णाचा मृत्यू झाल्यास नातेवाईकांची आर्थिक स्थिती लक्षात घेता, हे बिल अवाक्याबाहेर असते. अनेकदा रुग्णाचा एकही नातवाईक शहरात नसल्याने हे बिल भरण्यास अडचणींचा सामना करावा लागतो. दु:ख बाजूला ठेवून बिलाच्या रकमेची तजवीज करावी लागते. ही बाब लक्षात घेऊन, वरील निर्णय घेण्यात आला आहे.