हुसेन सिल्व्हर करंडक हॉकी स्पर्धा आजपासून

दोन माजी विजेत्यांच्या सहभागाचे आकर्षण

पुणे – यंदा होणाऱ्या आठव्या हुसेन सिल्व्हक करंडक हॉकी स्पर्धेसाठी बाहरील आठ संघांसह एकूण 22 संघ सहभागी होणार आहेत. हुसेन अली स्मृती अखिल भारतीय हॉकी स्पर्धा म्हणून ही स्पर्धा ओळखली जाते. पिंपरीतील नेहरुनगर येथील मेजर ध्यानचंद हॉकी मैदानावर 1 जुलैपासून स्पर्धेला सुरवात होईल.

हॉकी इंडिया आणि हॉकी महाराष्ट्रच्या वतीने हुसेन नबी शेख हॉकी अँड स्पोर्टस फौंडेशनच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 1 जुलै ते 7 जुलै या कालावधीत होईल. या मुख्य स्पर्धेरबराबेर 14 आणि 17 वर्षाखालील मुले, मुलींच्या गटातील स्पर्धा देखील घेण्यात येणार आहे.

स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना फौंडेशनचे संस्थापक फिरोज शेख म्हणाले,आम्ही स्पर्धेचे नाव बदलण्याचा विचार केला. पूर्वीपेक्षा वेगळ्या तसेच अधिक आकर्षक पद्धतीने आम्हाला ही स्पर्धा घ्यायची होती. हा निर्णय झाल्यावरच आम्ही या स्पर्धेची नाव बदलून घोषणा केली. विजेत्यांसाठी नवा करंडकही तयार करण्यात आला.

स्पर्धेत विजेत्या संघाला आकर्षक करंडक देण्यात येणार आहे. हा नवा करंडक पूर्ण चांदीने बनविण्यात आला आहे. त्याचे वजन साधारण 4.5 किलो असून, अंदाजे किंमत 2.5 लाख रुपये इतकी असेल. हा करंडक आकर्षक झाला असून, खेळाडू हा करंडक पाहूनच तो जिंकण्याच्या प्रेरणेने खेळतील, असा विश्वासही फिरोझ यांनी व्यक्त केला.

फौंडेशनचे सचिव सादिक शेख म्हणाले, ज्या हॉकीमुळे आम्हाला ओळख मिळाली, त्या खेळाचे उतराई होण्यासाठी आम्ही ही स्पर्धा सुरू केली. त्याचबरोबर स्थानिक संघांना त्यांचे कौशल्य दाखविण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि त्यांना देशातील तुल्यबळ संघांशी खेळता यावे हा देखील उद्देश आम्ही स्पर्धा सुरू करताना डोळ्यासमोर ठेवला होता.

यंदाच्या वर्षी स्पर्धेत विक्रम पिल्ले अकादमी, खडकी (2008, 2011), एक्‍सलन्सी अकादमी (2015, 2018) या दोनवेळच्या माजी विजेत्या संघांचा सहभाग असणर आहे. तर, मुंबई रिपब्लिकन्स, मुंबई कस्टम्स, स्पोर्टस ऍथॉरिटी गुजरात, नाशिक इलेव्हन, कोल्हापूर इलेव्हन आणि पुण्यातल क्रीडा प्रबोधिनीतील कुमार गटाचा संघ यांचा समावेश आहे, रोज चार सामने खेळविले जातील. यातील पहिला सामना दु. 11.45 वाजता खेळविण्यात येईल. उदघाटनाचा पहिला सामना रोव्हर्स आणि प्रियदर्शीनी स्पोर्टस सेंटर खडकी या संघां दरम्यान दु. 3.30 वाजता खेळविला जाईल.

अशी असतील पारितोषिके

एकूण रक्कम – 71,000
विजेता – 25,000
उपिवजेता – 15,000
तिसरा क्रमांक – 10,000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)