विनोदी किस्से आणि मीम्सद्वारे छुपा प्रचार

लोकशाहीचा उत्सव “इन ट्रेंड’ : मतदानानंतर सेल्फीची क्रेझ

पुणे – लोकसभेची उमेदवारी जाहीर होण्याआधीपासूनच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून प्रचाराला सुरूवात झाली होती. हा प्रचार मतदानादिवशीदेखील सुरू होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून विनोदी किस्से आणि मीम्स शेअर करून राजकीय पक्षांकडून छुपा प्रसार केला जात होता.

निवडणूक आयोगाच्या नियमानुसार रविवारी राजकीय प्रचाराचा शेवटचा दिवस होता. त्यानंतर कोणत्याही पक्षाच्या नेत्यांना अथवा कार्यकर्त्यांना आपल्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी बंदी घालण्यात आली होती. मात्र थेटपणे प्रचार करता येत नसले, तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून हा राजकीय प्रचार सर्रासपणे सुरू होता. व्हॉट्‌स ऍपवर फिरणारे विनोद, फेसबुक सोशल मीडियावरून फिरणारे विनोदी मीम्स यामाध्यमातून नागरिकांना थेटपणे मत देण्याचे आवाहन केले जात होते. या विनोदी “सोशल’ प्रचारात भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व जास्त होते. अगदी सर्जिकल स्ट्राइकपासून, राहुल गांधीच्या योजना आणि त्यांची उडविली जाणारी खिल्ली, अशा सर्वच विषयावर हे विनोद केले जात होते.

यातील काही विनोद पुढीलप्रमाणे :
“कमळाचे बटन दाबून आलो, अक्षरश: पाकिस्तानवर बॉम्ब टाकून आल्याचे फीलिंग येत आहे. पटत नसेल तर दाबा कमळाचे बटन आणि स्वत: अनुभव घ्या.’


” हुश्‍श…72 हजारांवर पाणी सोडून आलो.’


” राहूल गांधी मतदानाला गेल्यावर बराच वेळ वोटिंग मशिनकडे बघत होते. मग एकदमच कमळाचं बटन दाबून म्हणाले, बस इसको हराना है.’


“उद्या 23 तारखेला घर(झाडू)न काढून, पवित्र होऊन (घड्याळात) सात वाजले की मंदीरात जाऊन स्वच्छ (हाताने) श्रींच्या चरणी (कमळ) अर्पण करावे…’


अशा अप्रकारे विनोदी पोस्टचा भडिमार करत भारतीय जनता पक्षाकडून नागरिकांना मतदान करण्यासाठी आवाहन केले जात होते.

मतदानानंतर “फीलिंग प्राऊड’चा हॅशटॅग
लोकसभेसाठी मतदान करण्याबाबत नागरिकांमध्ये यंदा बरीच उत्सुकता होती. आदल्या दिवशीपासूनच सोशल मीडियावर “फीलिंग एक्‍सायटेड फॉर वोटिंग’चा हॅशटॅग टाकत लोक आपली उत्सुकता व्यक्त करत होते. तर मतदानाच्या दिवशी लवकरात लवकर मत करून, त्यानंतर सेल्फी घेत तो सोशल मिडियावर पोस्ट करत होते. सोबत “फीलिंग प्राऊड’, “वोटेड फॉर इलेक्‍शन’, “व्होट फॉर डेमोक्रसी’, राष्ट्रीय कर्तव्य यासारखे हॅशटॅगही नागरिक पोस्ट करत होते. तर काही जण कुटुंबासह मतदान केल्याचा फोटो शेअर करत होते. एकूणच सोशल मीडियावर दिवसभर लोकशाहीचा उत्सव “इन ट्रेंड’ होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)