गिरीश कर्नाड यांचा ‘सरगम’ चित्रपट ठरला शेवटचा

३३ वर्षानंतर मराठीत केले होते पदार्पण

जेष्ठ अभिनेते गिरीश कर्नाड यांनी ‘सरगम’ या मराठी चित्रपटामधून तब्बल ३३ वर्षांनंतर मराठी चित्रपटसृष्टीत पुनरपदार्पण केले होते. ‘उंबरठा’ या गाजलेल्या मराठी चित्रपटात गिरीश कर्नाड यांची महत्वाची भूमिका त्यांनी स्मिता पाटील यांच्या सोबत केली होती. त्यानंतर अद्याप त्यांनी कोणताही मराठी चित्रपट केलेला नव्हता. त्याच्या आयुष्यातील ‘सरगम’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.

‘सरगम’ हा चित्रपट एक १६ – १७ वर्षांच्या तरुण-तरुणीची प्रेमकथा आहे. मात्र या चित्रपटात ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक, अभिनेते गिरीश कर्नाड यांचीही मोठी भूमिका आहे. आयुष्यात सर्व काही मिळविल्यानंतर हे सगळं म्हणजे आयुष्य नव्हे, असा विचार करून एक व्यक्ती जंगलामध्ये निघून जाते आणि पुढचे आयुष्य तिथेच घालविते. निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या या व्यक्तीची भूमिका कर्नाड यांनी साकारली आहे.

चित्रपट निर्माते महेंद्र केसरी व दिग्दर्शक शिव कदम यांनी  कर्नाड यांच्या घरी जाऊन त्यांनी चित्रपटाची कथा ऐकविली. कथा ऐकताच त्यांना ती विलक्षण आवडली आणि त्यांनी लगेचच या चित्रपटात काम करण्यास होकार, त्यामुळे ३३ वर्षांनंतर या मोठ्या कलाकाराला मराठीत पुन्हा अभिनयासाठी घेऊन येण्याची संधी चित्रपट निर्माते महेंद्र केसरी व कदम यांनी मिळवून दिली.

ती भूमिका गिरीश कर्नाड यांच्याशिवाय अन्य कोणी करू शकणार नाही,याबद्दल आम्हाला खात्री होती. त्यामुळे त्यांनीच करावी यासाठी मी आग्रही होतो. सेट वर वेळेच्या अगोदर २० मिनिटे अगोदर मेकअप करून तयार असणारा हा अभिनेता त्याच बरोबर ज्युनिअर कालकारांना प्रोत्साहन देणारा हा अभिनेत्याबरोबरच एक उत्तम व्यक्तिमत होते. असे चित्रपट दिग्दर्शक शिव कदम आणि निर्माते एम के धुमाळ, महेंद्र केसरी, प्रसाद पुसावळे यांनी सांगिलते. ते पुढे म्हणाले. ‘सरगम’ चित्रपट सध्या सेन्सॉर मध्ये अडकला असून तो लवकरच आम्ही तो प्रदर्शित करू मात्र गिरीश कर्नाड यांच्या जाण्याने आम्हाला मोठा धक्का बसला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)