हापूर – उत्तर प्रदेशातील हापूर येथे आज एक धक्कादायक घटना उघडकीस आल्याने देशभरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, 2016 -17 मध्ये एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्यानंतर आतापर्यंत या प्रकरणात कोणावरही कारवाई न झाल्याने कंटाळून या महिलेने अखेर स्वतःला पेटवून घेतले आहे.
Yashveer Singh, SP Hapur: A woman has suffered burn injuries& is receiving treatment in hospital. In 2016-2017 she was allegedly gang raped in Hapur, since investigation wasn't taking place she had set herself ablaze. FIR has now been registered against 14 people. Probe underway. pic.twitter.com/4G6r4oDwk6
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) May 13, 2019
याबाबत हापूरचे पोलीस अधीक्षक यशवीर सिंग यांनी माहिती दिली असून ते म्हणाले, “एका महिलेने स्वतःला पेटवून घेतले असून तिच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या महिलेने 2016 -17 मध्ये आपल्यावर सामूहिक बलात्कार झाला असल्याची तक्रार नोंदवली होती मात्र त्यानंतर या प्रकरणात तपास न झाल्याने कंटाळून या महिलेने स्वतःला पेटवून घेतले असल्याची माहिती आहे. सदर प्रकरणी आता 14 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.”