अकरावी प्रवेश : आजपासून ऑनलाइन अर्ज भरता येणार

पुणे – अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. विद्यार्थ्यांना आजपासून संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. विद्यार्थ्यांनी माहिती पुस्तिकेचे नीट वाचून करुनच काळजीपूर्वक अर्ज भरणे आवश्‍यक आहे.

अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी प्रशासकीय पातळीवर व्यवस्थित नियोजन करण्यात आले आहे. यासाठी वेळापत्रकही आखण्यात आले असून शासनाच्या निर्णयाप्रमाणे त्याची अंमलबजावणी करण्यात येऊ लागली आहे. सन 2019-20 या शैक्षणिक वर्षासाठी अकरावीच्या वर्गात विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी 301 कनिष्ठ महाविद्यालयांनी तयारी दर्शविली असून यातील 298 महाविद्यालयांनी ऑनलाईन नोंदणीही पुर्ण केली आहे. गेल्या वर्षी महाविद्यालयांची संख्या 286 एवढी होती. यंदा काही नवीन महाविद्यालयांनी मान्यता मिळविली असल्याने महाविद्यालयांच्या एकूण संख्येत वाढ झाली आहे. पुण्यातील एक व भोसरीतील एक महाविद्यालय बंद करण्यात आलेले आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना सकाळी 11 वाजता ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची सुविधा संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. दोन टप्प्यांमध्ये अर्ज भरावा लागणार आहे. यात अर्जाचा भाग-1 हा वैयक्तिक माहितीचा तर भाग-2 हा कनिष्ठ महाविद्यालयांच्या पसंतीक्रमांचा असणार आहे. अर्जाचा भाग-1 आता भरता येणार असून अर्जाचा भाग 2 हा दहावीच्या ऑनलाइन निकालानंतर भरता येणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)