11वी प्रवेश प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज

केंद्रीय प्रक्रिया : पुणे, पिंपरी-चिंचवडसाठी एकूण 9 झोन

पुणे – विद्यार्थ्यांच्या करियरचा महत्त्वाचा टप्पा असलेल्या इयत्ता अकरावीची प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून सुरू होत आहे. यासाठी पुणे व पिंपरी-चिंचवडसाठी एकूण 9 झोनची व्यवस्था करण्यात आली असून या ठिकाणी मार्गदर्शन केंद्रे सज्ज ठेवण्यात आली आहेत.

राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचे विद्यार्थी व सीबीएसई, सीआयएसई, आयजीसीएसई, आयबी, एनआयओएससह अन्य मंडळाचे विद्यार्थी, व्यावसायिक अभ्यासक्रम यांच्यासाठी स्वतंत्र मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आली आहेत. ही मार्गदर्शन केंद्रे सकाळी 10 ते सायंकाळी 5 यावेळेत सुरू राहणार आहेत.

विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी सूचना
* पुणे आणि पिंपरी-चिंचवड क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी http://pune.11thadmission.net या संकेतस्थळावर अर्ज भरावेत.
* शाळेतून अथवा मार्गदर्शन केंद्रातून माहिती पुस्तिका खरेदी करा.
* माहिती पुस्तिकेची किंमत 150 रुपये.
* माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचा व प्रवेश प्रक्रिया समजून घ्यावी.
* शाळा अथवा मार्गदर्शन केंद्रांची मदत घ्यावी.
* लॉगिन आयडी व पासवर्ड नीट लक्षात ठेवा.
* सिक्‍युरिटी प्रश्‍न व पासवर्ड याची प्रिंट काढून नीट जपून ठेवा.
* संकेतस्थळावरील सूचनांप्रमाणे टप्प्याटप्प्याने अर्ज भरावा.
* दहावीच्या परीक्षेचा बैठक क्रमांक टाकल्यावर येणारी वैयक्‍तिक माहिती तपासून घ्या.
* राज्य मंडळाव्यतिरिक्‍त अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना सर्व माहिती स्वत: भरावी लागणार.
* भरलेली माहिती अचूक असल्याबाबत शाळा अथवा मार्गदर्शन केंद्रातून अर्ज प्रमाणित करून घ्या.
* अर्ज प्रमाणित करण्यासाठी आवश्‍यक कागदपत्रे दाखवा.
* प्रमाणिक केलेल्या अर्जांची प्रिंट घ्या व ती जपून ठेवा.
* प्रमाणित न केलेल्या अर्जांचा प्रवेशासाठी विचार केला जाणार नाही.
* अर्जातील माहितीत काही दुरुस्ती करावयाची असल्यास शाळा अथवा मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधावा.

झोननिहाय मार्गदर्शन केंद्र
झोन क्र. 1 : पुणे शहर मध्य : मार्गदर्शन केंद्र :
1) स.प.महाविद्यालय, टिळक रोड, पुणे-30.
2) नू.म.वि.मुलांचे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, अप्पा बळवंत चौक, पुणे-2.
3) शिवाजी मराठा माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, शुक्रवार पेठ, पुणे-30.
4) एस. व्ही. युनियन कनिष्ठ महाविद्यालय, सोमवार पेठ, पुणे-11.
5) नू.म.वि.मुलींची प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, सदाशिव पेठ, पुणे-30.

झोन क्र.2 : कर्वे रोड -कोथरुड-वारजे : मार्गदर्शन केंद्र
1) आबासाहेब गरवारे महाविद्यालय, कर्वे रोड, पुणे.
2) एस.एन.डी.टी.कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, कर्वे रोड, पुणे.
3) महिलाश्रम कनिष्ठ महाविद्यालय, कर्वेनगर, पुणे.

झोन क्र. 3 : पर्वती-स्वारगेट-कात्रज : मार्गदर्शन केंद्र
1) श्री शाहू मंदिर महाविद्यालय, पर्वती, पुणे.
2) कर्मवीर भाऊराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय, धनकवडी, पुणे.
3) मोलेदिना माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, पुणे-37.
4) विश्‍वकर्मा कनिष्ठ महाविद्यालय अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे-37.

झोन क्र. 4 : सिंहगड रोड : मार्गदर्शन केंद्र
1) वसंतराव सखाराम सणस माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, धायरी फाटा, पुणे-41.
2) ज्ञानगंगा कनिष्ठ महाविद्यालय, विश्रांतीनगर, हिंगणे खुर्द, सिंहगड रोड, पुणे.
3) बंडोजी खंडोजी चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय, धायरी, पुणे.

झोन क्र. 5 : पुणे कॅम्प-येरवडा : मार्गदर्शन केंद्र
1) नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे-1.
2) पूना कॉलेज, गोळीबार मैदान, पुणे-1.
3) आबेदा इनामदार मुलींचे कनिष्ठ महाविद्यालय, आझम कॅम्पस, कॅम्प, पुणे.
4) अर्हम शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, कॅम्प, पुणे-1.
5) नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालय, येरवडा, पुणे.

झोन क्र. 6 : हडपसर-कोंढवा-खराडी : मार्गदर्शन केंद्र
1) साधना विद्यालय व रा. रा. शिंदे कनिष्ठ महाविद्यालय, हडपसर, पुणे-28.
2) अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर, पुणे.
3) हरिभाऊ बळवंतराव गिरमे कनिष्ठ महाविद्यालय, वानवडी, पुणे.
4) श्री. पी. टी. पठारे कनिष्ठ महाविद्यालय, चंदननगर, पुणे-14.

झोन क्र. 7 : शिवाजीनगर-औंध-पाषाण-खडकी : मार्गदर्शन केंद्र
1) मॉडर्न महाविद्यालय, शिवाजीनगर, पुणे-5.
2) फर्गसन महाविद्यालय, पुणे-4.
3) एम. पी. इंटरनॅशनल शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, शिवाजीनगर, पुणे-4.
4) आदित्य इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेहपार्क, बाणेर, पुणे.
5) स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, दापोडी, पुणे.
6) सी. के. गोयल कनिष्ठ महाविद्यालय, खडकी, पुणे-3.

झोन क्र.8 : पिंपरी-सांगवी-भोसरी : मार्गदर्शन केंद्र
1) नवमहाराष्ट्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पिंपरी गाव, पुणे-17.
2) भारतीय जैन संघटना शाळा, संत तुकारामनगर, पिंपरी, पुणे-18.
3) श्री भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, भोसरी, पुणे.
4) बा. रा. घोलप विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, सांगवी, पुणे-27.
5) मराठवाडा मित्रमंडळाचे कनिष्ठ महाविद्यालय, थेरगाव, पुणे.

झोन क्र.9 : चिंचवड-आकुर्डी-निगडी : मार्गदर्शन केंद्र
1) श्री म्हाळसाकांत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, आकुर्डी, पुणे-44.
2) श्रीमती ताराबाई मुथा प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, चिंचवड, पुणे-33.
3) प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालय, काळभोरनगर, चिंचवड स्टेशन, पुणे-19.

अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र मार्गदर्शन केंद्र
झोन क्र.1 : आर.सी.एम.गुजराथी माध्यमिक विद्यालय व डी.बी.दादावाला कनिष्ठ महाविद्यालय, फडके हौद, पुणे-11.
झोन क्र.2 : डॉ. कलमाडी माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, गणेशनगर, एरंडवणे, पुणे-4.
झोन क्र.3 : राजीव गांधी ई-लर्निंग स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, सहकारनगर, पुणे-9.
झोन क्र.4 : सिंहगड कॉलेज ऑफ ऑर्टस, सायन्स, ऍन्ड कॉमर्स, आंबेगाव बुद्रुक, पुणे-41.
झोन क्र.5 : सेंट मीराज्‌ कॉलेज फॉर गर्ल्स, कोरेगाव पार्क रोड, पुणे-1.
झोन क्र.6 : प्रितम प्रकाश शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, मेगा सेंटर, हडपसर, पुणे.
झोन क्र.7 : सिम्बायोसिस कॉलेज ऑफ आर्टस ऍन्ड कॉमर्स, सेनापती बापट रोड, पुणे-4.
झोन क्र.8 : एस.एन.बी.पी. माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, रहाटणी, पिंपरी, पुणे-17.
झोन क्र.9 : प्रेरणा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सेक्‍टर 27-अ, निगडी प्राधिकरण, पुणे-44.

व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी मार्गदर्शन केंद्र
झोन क्र.1 : राजा धनराज गिरजी माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, रास्ता पेठ, पुणे.
झोन क्र.2 : एस.एन.डी.टी.कॉलेज ऑफ सायन्स, कर्वे रोड, पुणे.
झोन क्र.3 : श्री शाहू मंदिर महाविद्यालय, पर्वती, पुणे.
झोन क्र.4 : जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय, घोले रोड क्षेत्रीय कार्यालयासमोर, घोले रस्ता, पुणे-5.
झोन क्र.5 : कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे कनिष्ठ महाविद्यालय, बाबाजान चौक, कॅम्प, पुणे-1.
झोन क्र. 6 : लोणकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मुंढवा, पुणे.
झोन क्र. 7 : शासकीय तांत्रिक विद्यालय, घोले रोड क्षेत्रीय कार्यालयासमोर, घोले रस्ता, पुणे-5.
झोन क्र.8 : नवमहाराष्ट्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पिंपरी गाव, पुणे-17.
झोन क्र.9 : श्री फत्तेचंद जैन माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, चिंचवड, पुणे-33.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.